दोंडाईचा येथील सुप्रसिद्ध निरमा पावडरचे व्यापारी श्री. शामलाल अग्रवाल यांचे दोंडाईचा शहरासाठी मोठे सामाजिक योगदान आहे. व्यापारी म्हटले कि दुकान आणि मकान इतकेच दिसते परंतु श्री. शामलाल अग्रवाल यांनी व्यापार करुन मिळालेल्या वेळेत समाज कार्य व धार्मिक कार्य करुन अग्रवाल समाजाचे नावलौकिक करण्याचा प्रयत्न म्हणजे योगायोग असावा परंतु त्यांच्या घरात दोन्ही सुपुत्रांचा जन्म हाही योगायोग आहे. ३१ आॅगस्ट म्हणजे महिन्याचा शेवटचा दिवस हा दिवस श्री. शामलाल अग्रवाल यांच्यासाठी विषेश आहे शामलाल अग्रवाल यांचे मोठे सुपुत्र श्री. श्रीकृष्ण अग्रवाल यांचा जन्म हा गोकुळ अष्टमीचा असल्याने त्यांचे नाव श्रीकृष्ण ठेवले आहे त्यांनी खताच्या व्यवसायात उंच भरारी घेतली असली तरी समाजाकडे दुर्लक्ष केले नाही. आज श्रीकृष्ण अग्रवाल समाजसेवा करुन वडिलांची परंपरा सांभाळत आहेत. त्यांच्याकडे दोंडाईचा अग्रवाल समाज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पद असले तरी कधी मिरवले नाही. त्यानंतर शामलाल अग्रवाल यांचे दुसरे सुपुत्र श्री. संजय अग्रवाल उर्फ (सनन) नावाने प्रसिद्ध आहेत त्यांचाही जन्म ३१ आॅगस्ट चा त्या दिवशी गोकुळ अष्टमी नसली तरी भावाचा आदर्श घेऊन वाटचाल सुरू आहे अर्थात दोन्ही भावांचा जन्म हा ३१ आॅगस्ट चा आहे म्हणून दोन्ही भावांचा वाढदिवस हा सुवर्ण योग असला तरी योगायोगच म्हणावा लागेल तशी हि आई, वडिलांची पुण्याई आहे आज दोन्ही भावांना वडीलांची साथ आणि आईचा आशिर्वाद असल्याने व्यवसायात नावलौकिक मिळवला आहे. संजय अग्रवाल हे तर सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात कृषी क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकरींना फायदा कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना त्याला राजकीय काम करण्याची संधी उपलब्ध होते तशी संधी संजय अग्रवाल यांनाही मिळाली संजय अग्रवाल हे भाजप या पक्षाचे अधिकृत व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सरचिटणीस आहेत या माध्यमातून आमदार जयकुमार रावल यांच्याशी जवळीक आणि जिव्हाळाचे नाते आहे. नगरपरिषद सत्ता काळात आमदार जयकुमार रावल यांनी संजय अग्रवाल यांना स्विकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली या संधीच सोन कसे करावे याचे उत्तम ज्ञान अवगत असल्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून विकास कामांच्या योजना जयकुमार भाऊ यांच्या कडून मंजूर करुन घेतल्या होत्या त्यात स्टेशन भागातील मुख्य पारवोटा पासुन तर राजपथ पर्यंत चा रस्ता काँक्रीटीकरण करुन घेतला या सोबत पथदिवे लावून घेतले नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्टेशन भागाची साफसफाई करुन आपला परिसर चकाचक करुन घेतला हा फक्त एका वर्षाचा स्विकृत नगरसेवक पदाचा कार्यकाळ होता तरी नगरसेवक पदाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न संजय अग्रवाल यांनी केला. स्टेशन भाग व काॅलणी परिसरात सुशिक्षित विचारवंत मतदार असतात त्यांना जाणीव असते कोण आपला आणि कोण परका हक्काचा माणूस म्हणून संजय अग्रवाल यांच्या कडे बघतात जे काम करण्याची संधी एका वर्षासाठी स्विकृत नगरसेवक म्हणून मिळाली होती तीच संधी पाच वर्षे काम करण्यासाठी मिळाली तर लोकप्रिय लोकांमधून निवडून येणारे नगरसेवक होण्याचा बहुमान मिळेल जी कामे एका वर्षात करता आली त्यापेक्षा जास्त सामाजिक आणि विकासात्मक कामे करता येतील याची खात्री संजय अग्रवाल यांच्या पेक्षा जास्त सुशिक्षित मतदारांना आहे. कारण संजय अग्रवाल नेहमी एकमेकांच्या सुखा: दुखात सहभागी होतात अशा लोकप्रिय शेतकरी हिताचे व्यावसायिक श्रीकृष्ण अग्रवाल आणि संजय अग्रवाल या दोन्ही भावांचा योगायोग असलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
अहिल्या न्यूज मिडीया*साभार
0 Comments