*जनमत-*
*दोंडाईचा-* एखाद्या समाजात जन्म घेऊन फक्त घर-परिवारासाठी जीवन न जगता,समाजासाठी ही आपण काही चांगले काम केले पाहिजे, ह्या सेवाभावी वुत्तीतुन, ह्या वर्षी अग्रवाल धर्मशाळेच्या विषयात हात टाकून, कमी वेळात पैसा कमविणाऱ्या गावातील दलाली-रामी वुत्तीच्या-व्यक्तींच्या तावडीतुन जागा सोडवत,मा.जिल्हाधिकारी यांचा स्टे-मिळवत,धर्मशाळेची जागा सरकार जमा करत, चक्क दोघी भावांनी एकाच दिवशी वाढदिवस साजरा करत आहे व दलाली-फसवेगिरी- घरकुल योजना भ्रष्ट्राचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भ्रष्ट राजकारणी-मा.नगरसेवकाच्या तावडीतुन (संबंधित व्यक्तीचे नाव घेऊ शकत नाही,असा काही भाग नाही आहे.फक्त समाजात यांचे अनुकरण करून आणखी भ्रष्ट व्यक्ती जन्माला यायला नाही पाहिजे.म्हणून नाव घेत नाही आहे.पण चुकून संधी उपलब्ध केली तर दिलेली संधी वाया जावू देणार नाही,ऐवढे हे पांढरे कपड्यांचा मुखवटा घालून भ्रष्ट लोकांना शाश्वती देतो) जागा सोडवुन समाजाला न्याय मिळवून द्यायचे,आमचे कर्तव्य आहे,असे ही मत दोघी भावांनी जनमतशी बोलतांना व्यक्त केले.तसा वाढदिवस म्हटला तर एका घरात ठराविक एका तारखेला एकच व्यक्तीचा वाढदिवस असतो.पण प्रभु श्रीकृष्णाची लिला पहा. श्री शामलाल काका यांच्या घरी वेगवेगळ्या वर्षात एकाच तारखेला दोन मुलांचा वाढदिवस म्हणजे सोने पे सुहागा व भगवान श्रीकुष्ण व अर्जुनाची जोडी ह्या पुथ्वीवर जन्माला आली आहे असे म्हणता येईल. कारण प्रभु श्रीकृष्ण यांनी जसे सारथी बनून महाभारतात अर्जुनाची साथ दिली. तशीच साथ शामलाल काका यांचे मोठे चिंरजीव श्रीकृष्ण अग्रवाल हे आपले लहान बंधु माजी नगरसेवक व उत्तर महाराष्ट्र भाजपा व्यापारी आघाडीचे सहप्रमुख श्री संजय अग्रवाल उर्फ सनन यांना दैनंदिन व्यापार-व्यवसायात,सामाजिक, राजकीय व पारिवारिक संबधात देत आहे.त्यामुळे ह्या परिवाराने वर्षानुवर्षे नुसते जनतेशी व्यापारी संबंध प्रस्थापित न करता समाजाचे आपण काही देणे लागतो. ह्या सेवाभावी वुत्तीतुन अग्रवाल समाजाचे अध्यक्ष पदापासून ते नगरसेवक पदापर्यंत दोघी भाऊ सेवा देत,परिवाराचा नावलौकिकात भर टाकत आहे. आज ह्या दोघी सख्खे भावांचा एकाच दिवशी म्हणजे ३१ आँगस्ट २०२१ मंगळवार रोजी वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्यशैलीवर जनमत-टुडेने टाकलेले अल्पशा प्रकाशझोत.....
अग्रवाल उर्फ जे.जे.अग्रवाल परिवाराला दोंडाईचा शहर व तालुका परिसरात कोण ओळखत नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. गावात व्यापार-व्यवसाय,वैद्यकीय, चार्टर्ड अंकाऊटंन क्षेत्रात नावाजलेले अग्रवाल परिवार आहे. आज ह्या वटवृक्षाच्या अनेक फांद्या वेगवेगळ्या क्षेत्रात जनतेची सेवा करत उदरनिर्वाह करत आहे. पुर्वी किराणा व्यवसायापासुन जनतेच्या सेवेत आलेले अग्रवाल परिवार. आजमितीला व्यापार-व्यवसाय, वैद्यकीय, बँकींग, कर सल्लागार, इंस्ट्रीयल कंपनी,समाजसेवा,राजकीय आदी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत. जनतेशी नाळ जोपासत सेवा देत आहे. त्यातीलच आज दोन अनमोल हिरे श्रीकृष्णभाऊ अग्रवाल व संजयभाऊ उर्फ सनन यांचा वाढदिवस. श्रीकृष्णभाऊ यांचा जन्म ३१/०८/१९६४ साली दोंडाईचा येथे शामलाल काका यांच्या घरी झाला. त्यांच्या बाबतीत म्हणायचे तर, वडिलांचा किराणा व्यवसाय जरी असला तरी शिक्षणा बाबतची ओढ लहानपणापासून जबरदस्त होती. शिक्षणातुन माणुस स्वतः प्रगती करत,परिवाराचीही प्रगती करतो. ह्या उद्देशाने श्रीकृष्ण भाऊ यांनी दहावी पर्यतंचे शिक्षण गावात घेत. पुढील शिक्षणासाठी नासीक शहर गाठले.त्यावेळी वाणिज्य शाखेत अंकाऊटं हया विषयात महाविद्यालयात टाँपर करत प्रथम येणारे ते पहिले आपल्या गाव भागातील व्यक्ती होते. आजही महाविद्यालयात त्यांचे नाव प्रथम क्रमाकांवर कोरलेले आहे. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली.त्याठिकाणी त्यांनी सी.ए.ची पदवी १९८७ ला मिळवली. सन १९८७ हे वर्षे म्हटले तर आपल्याकडे दुरदुर पर्यंत सी.ए.म्हणजे काय ? व त्यांचे काम काय? असते हेच लोकांना फारसे माहित नव्हते. त्यावेळी मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी सी.ए. लोकांचे महत्त्व होते.मात्र श्रीकृष्ण भाऊ यांनी सी.ए.ची पदवी मिळवल्यावर मोठ्या शहरात राहून भरगच्च पैसा न कमविता. गावाचा व परिवाराचा विचार करत दोंडाईचा गावी आपल्या पारिवारिक व्यवसायाकडे लक्ष घालत,भाऊला व्यवसायात साथ देण्यासाठी परिवाराची जबाबदारी अंगावर घेतली.आजही त्यांच्याकडे कोणी पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन घ्यायला तरुण मंडळी आली.तर खुल्या मनाने ते सखोल मार्गदर्शन करतात. वेळप्रसंगी आर्थिक मदतही कोणाला लागली तर ती ही करायला मागेपुढे पाहत नाही. त्यांच्या ह्याच सेवाभावी वुत्तीच्या पुण्याईमुळे एक मुलगा मुंबई येथे बँकींग क्षेत्रात चांगल्या पगारावर काम करत आहे. तर दुसरा मुलगा सिंगापूर येथे शिक्षण घेत, इंडस्ट्रीयल क्षेत्रात काम पाहत आहे. ऐवढ्यावरच न थांबता.म्हणून त्यांनी आपल्या व्यवसायाशी निगडीत नंदुरबार येथे श्रीशाम असोशियन प्रा.लि.नावाची फर्म सुरु केली आहे. त्यांच्यातील कामाची हीच उर्जा पाहून समाजाने त्यांना मागील पाच वर्षापासून अग्रवाल समाजाचे अध्यक्ष पद बहाल केले आहे व त्यांचे आजही काम निरंतर चालू आहे.
तसेच त्यांचे दुसरे अनमोल बंधू संजयभाऊ उर्फ सनन यांचाही जन्म आजच्या दिवशी दिनांक ३१/०८/१९६८ साली गावात डॉ. सोनी यांच्या दवाखान्यात झाला. संजयभाऊ यांनीही आपल्या मोठ्या भावाच्या पाऊलावर पाऊल ठेवत,शिक्षणाकडे लहानपणापासून व्यवसायिक-सामाजिक दुष्ट्रीकोनातुन लक्ष दिले. म्हणून महाविद्यालयीन जीवनात त्यांनी चळवळी करत,विद्यार्थ्यांचे सेक्रेटरी पदापासून जेएस.पदापर्यंत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत प्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे.त्यानंतर त्यांनी कला शाखेतील हिन्दी विषयात पदवी जरी मिळवली. तरी नोकरी क्षेत्राकडे न वळता.त्यांचे जनते विषयी हळवे-भावुक मन व्यवसाय-समाजकारण, राजकारणाकडे ओढत होते.म्हणून त्यांनी शिक्षण पुर्ण केल्यावर गावात प्रथम बजाज कंपनीचे टु-व्हीलर गाडीचे शोरूम सुरू केले.त्यानंतर दैनंदिन गाडी विक्री निमित्त शेतकरी बांधवांशी संबध येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा अज्ञान-अशिक्षित पणामुळे शेती व्यवसायात त्यांना येत असलेले नुकसान पाहून. संजयभाऊ यांनी कुषी-बी बियाणे व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्यांना मोठे भाऊ श्रीकृष्ण व वडीलांचीही साथ मिळाली. अल्पावधीत त्यांनी आपल्या वाकचातुर्यातुन शेतकऱ्यांना कमी पैशात चांगल्या खत-बियाण्यांची माहिती देत. त्यांची मने जिंकली.आजही ग्रामीण भागातील माणुस शाम एजन्सीचे नाव घेऊन खते- बी-बियाणे घ्यायला गावात येतो. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईडस,सीडस डीलर्स असोशियनच्या सचीवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर संजयभाऊ पण मात्र ऐवढ्यावरच न थांबता गावातील इतर व्यापारी-व्यवसायिकांची व्यवसायात दैनंदिन होत असलेली बिकट परिस्थिती पाहता.त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तालुका, जिल्हा, नाशिक विभागावर धडपड करायचे.त्यांच्यांतली व्यापारी बाधवांविषयी तळमळ पाहून भाजपा पक्षाने त्यांना उत्तर महाराष्ट्र भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या सहप्रमुख पद बहाल केले. आजही संजय भाऊ व्यापाऱ्याचे बरेचसे प्रश्न यामाध्यमातुन सोडवत आहेत.
वयाच्या चौपंव्या वर्षीही संजय भाऊमधील सप्तगुण त्यांना आजही शांत बसु देत नाही. त्यांचे कोणतेही क्षेत्रातील काम चोख-निपूण करण्याची कलाकारी पाहून. लोकांनी त्यांना सनन नावाने उपाधी दिली आहे आणि आजही त्यांचे हे सनन नाव मुळ नावापेक्षा जास्त प्रचलित आहे.संजय भाऊंना कोणी अडी-अडचणीत असेल किंवा कोणावर अन्याय-अत्याचार होत असेल तर त्याठिकाणी प्रथम धावूत जातात. त्यांच्यातील माणसांच्या समस्येविषयी प्रश्न सोडण्याची जागरूकता पाहून मा.मंत्री जयकुमार भाऊ यांनी नगरपालीकेच्या स्विकुत नगरसेवक पद बहाल केले होते. आजही भाऊंना माहित आहे. ज्यावेळेस भाजपा पक्षाचा झेंडा स्टेशन भागात कोणी व्यापारी घेऊन फिरायला तयार नव्हता. त्यावेळेस संजयभाऊ यांनी मोठ्या हिमंतीने-दिमाखदार वुत्तीने सर्व व्यापारांना एकत्र करत,भाऊंच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढवला. संजय भाऊंनी मागील दोन वर्षापुर्वीच्या करोना काळात आपली दोघी वकील व चार्टर्ड अंकाऊटचे शिक्षण घेणारी मुले यांची सोबत घेत,कधीही प्रसिद्धीच्या भानगडीत न पळता. गोर-गरिब, गरजवान लोकांना यथोचित मास- अन्न धान्याची मदत केली. आजही गोशाळेला चारा देणे, रोटी बँकेला महिन्याकाठी सहकार्य करणे आदी समाजकार्य विना प्रसिद्धी सुरू आहे. तरी आजच्या ह्या कठिण काळात व्यापार-व्यवसाय सांभाळत. अशा ह्या सेवाभावी वुत्ती जोपासणाऱ्या एकाच दिवशी वाढदिवस असणाऱ्या माझे दोघी मोठे बंधु श्रीकृष्ण भाऊ व संजयभाऊ अग्रवाल यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व येणाऱ्या काळात आई एकवीरा त्यांना सुदृढ आरोग्य प्रधान करून अशीच गोर-गरिबांची समाजसेवा त्यांच्या हातुन निरंतर चालू ठेवो,अशी अपेक्षा जनमत-टुडे परिवार त्यांच्याकडून बाळगुन आहेत व भावी निरोगी आयुष्यासाठी पुन्हा कोटी कोटी शुभेच्छा देत आहेत...
0 Comments