Header Ads Widget

शिंदखेडा येथील *कु.लक्ष्मी सोनवणे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार*




शिंदखेडा-- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जिल्हा स्तरावर झालेल्या मैदानी स्पर्धा मध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा जिल्हा क्रीडा कार्यालय मार्फत सन्मान करण्यात आला प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी गोयल साहेब व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता साहेब यांच्या हस्ते 17 वर्षे आतील मुलींच्या गटात शिंदखेडा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. लक्ष्मी राजाराम सोनवणे हिने आठशे मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश संपादन केल्याने सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व एक हजार रुपयांचा धनादेशाने गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डॉ. आर.आर.पाटील व संस्थेचे सचिव दादासाहेब इंजि.उज्वल आर.पाटील यांनी अभिनंदन केले.
श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.डी.पाटील, उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या प्र.मुख्याध्यापिका ए.के.माळी, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी लक्ष्मीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments