गावातील सर्व बंधू-भगिनींना कळविण्यात येते की दिनांक *05/09/2023* रोजी वार मंगळवार वेळ सकाळी 11.00 वाजता साक्री पंचायत समिती साक्री येथे आपल्या सर्वांच्या हक्काच्या घरासाठी आमरण उपोषण ठेवण्यात आले आहे तरी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की ज्या लाभार्थ्याचे यादीमध्ये नाव आहे व काही लाभार्थ्यांचे ऑनलाईन यादी मध्ये नाव नाही अशा सर्वांनी उपोषणासाठी आपला सहभाग नोंदवायचा आहे तालुक्यात एकमेव आपलाच असं गाव आहे की आपल्या गावाला प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत फक्त आठ ते नऊ लाभार्थ्यांना घरकुल योजना चा लाभ मिळाला आहे गेल्या दहा-बारा वर्षांपासून आपल्या गावातील लाभार्थी वंचित आहेत याच विषयाचा जाब विचारण्यासाठी पंचायत समिती साक्री येथे मी *उपसरपंच कैलास मोठाभाऊ भदाणे* आमरण उपोषणास बसणार आहे तरी गावातील सर्व लाभार्थ्यांनी आपला अनमोल सहभाग नोंदवायचा आहे.
याआधी सुद्धा आपण सर्व मिळून रास्ता रोको आंदोलन साक्री येथे दिनांक 17/08/2021 रोजी केले होते आपल्याला लेखी आश्वासन सुद्धा मिळाला आहे त्याचाच आधार घेत दोन वर्षे झाली पण आपल्या गावातील ग्रामस्थांना व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ अध्याप मिळालेला नाही याच कारणास्तव मी आमरण उपोषणाच निवेदन माननीय गटविकास अधिकारी साहेब साक्री दिलेलं आहेत
*आपल्या मागण्या खालील प्रमाणे*
1) प्रधानमंत्री घरकुल योजनेत *ड* यादीत नावे असलेले सर्व लाभार्थ्यांना तात्काळ प्रशासनाचे मंजुरी देण्यात यावी.
२) घरकुल योजने पासून वंचित असलेले सर्व उंभर्टी येथील लाभार्थ्यांचा ऑफलाईन अर्ज भरून तात्काळ मंजुरी देण्यात यावी.
३) उंभर्टी येथील ग्रामस्थ यांना गेल्या अकरा वर्षापासून घरकुल योजने पासून वंचित असून त्यांना कुठल्याही घरकुल योजना चा लाभ ग्रामस्थांना अद्याप मिळालेला नाही त्यांना तात्काळ मागील अनुशेष सह लाभ देण्यात यावा.
*वरील सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे सुरू राहील..*
गावातील सर्व लहान थोर ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या ग्रामस्थांना विनंती आहे की जात पात धर्म पक्ष बाजूला ठेवून आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणास आपला अनमोल सहभाग नोंदवा अशी आपणास नम्र विनंती.
आपलाच
कैलास मोठाभाऊ भदाणे
उपसरपंच ग्रामपंचायत उंभर्टी
ता.साक्री जि.धुळे.
मो.नं.9767615807
0 Comments