बेटावद---राहुल जी पवार
सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला असला तरीही जमिनीतली ओल आटल्याने आता उगवलेल्या अंकुरांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
गेल्या महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना समाधान लाभले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरण्यांनाही प्रारंभ केला. मोठय़ा प्रमाणावर परिसरात पेरण्याही झाल्या. कापूस,मूग,बाजरी,मका आदी पिकांची लागवड ज्या शेतकऱ्यांनी केली ते आता धास्तावले आहेत. पण आता या पिकांचे भवितव्य संकटात सापडले आहे. सुरुवातीला जमिनीत ओल होती त्यामुळे पेरण्या झाल्या. जमिनीत ओल असल्याने पेरण्यांचा वेगही खूप होता. ही पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याला दमदार पावसाची अपेक्षा होती. मात्र असा पाऊस आता दडी मारून बसल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.
आधीच मागील वर्षी रब्बी चे पीक अवकाळी पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलेला होता.अशावेळी आता पुन्हा पावसाने ताण दिल्यामुळे शेतकरी काळजीने ग्रासले आहे. महागाचे बियाणे पेरून मोकळा झालेला शेतकरी आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या पावसाची नक्षत्रे कोरडी जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
0 Comments