Header Ads Widget

*शिंदखेडा येथील एस. एस. व्ही. पी. एस महाविद्यालयात शालेय तालुकास्तरीय शासकीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात*




 शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -- 
       श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे  कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य वाणिज्य  आणि  कै. भाऊसाहेब म. दि. सिसोदे विज्ञान महाविद्यालयात दि 12  व 13 सप्टेंबर रोजी शालेय शिंदखेडा तालुकास्तरीय शासकीय 


व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  प्रथम मान्यवरांच्या हस्ते  श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारणी समितीचे अध्यक्ष   बापूसाहेब प्रफुल्लकुमार सिसोदे उपाध्यक्ष  बापूसाहेब अशोक पाटील स्थानिक कार्यकारणी समितीचे सदस्य भाऊसाहेब प्रा सुरेश देसले प्राचार्य, डॉ. तुषार एम. पाटील उप प्राचार्य  डॉ. एस. व्ही. बोरसे उप प्राचार्य  डॉ. विशाल पवार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  एस. टी. राऊळ प्रा परीक्षित सिसोदे कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील प्रा. आर. के. पवार श्री बाबा मराठे, प्रा सतीश भदाणे शिंदखेडा तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डी जे सोनवणे यांनी केले 
सदर स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे स्थानिक कार्यकारणी समितीचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्रफुल कुमार  सिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले
      क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी , क्रीडा संचालक राहुल पाटील,  महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आदींनी परिश्रम घेतले.
*शिंदखेडा तालुकास्तरीय  व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजयी व उपविजेयी संघ*
14 वर्ष मुले विजयी: वि के पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा , उपविजयी: फ म ललवाणी माध्यमिक व डॉक्टर श्री तू गुजर उच्च माध्यमिक विद्यालय बेटावद 
 14 वर्ष मुली विजयी संघ हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा उपविजयी वरपाडे हायस्कूल
१७ वर्ष मुले विजय संघ जनता हायस्कूल शिंदखेडा उप विजयी हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा
१७ वर्ष मुली विजय संघ पूज्य साने गुरुजी माध्यमिक विद्यालय चौगाव उपविजयी संघ आईसाहेब सकुबादेवी  माध्यमिक विद्यालय दिवी
19 वर्ष मुले विजयी संघ एस एस व्ही पी एस कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा उपविजयी जनता हायस्कूल शिंदखेडा
19 वर्ष मुली विजयी संघ एस एस एस व्ही पी एस कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा 🏐🏐   

Post a Comment

0 Comments