शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - 13 सप्टेंबर जागतिक आदिवासी अधिकार दिवस निमित्त आदिवासी एकता परिषद शिंदखेडा मार्फत विर एकलव्य नगर येथे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या हस्ते आदिवासी कुलदैवत याहा मोगी माता प्रतिमा पुजन करून कायद्याविषयी मार्गदर्शन करताना तरूण पिढीने मोठ्या प्रमाणात शिक्षण करुन नोकरी मिळवावी. कायद्याविषयक सल्ले घेत उपाय योजना राबवाव्यात.असे हयावेळी पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात तरूण मंडळी उपस्थित होती. आदिवासी एकता परिषद तालुका सचिव गुलाब सोनवणे, सहसचिव भुपेंद्र देवरे , शाम सोनवणे, दीपक फुले, शंकर मोरे, एकनाथ भिल्ल,मनोज मोरे, रणजीत बागुल, रामनाथ मालचे, दीपक मोरे,पांडू मोरे, सचिन मालचे, मोतीलाल सोनवणे, गुरुदेव भिल, योगेश सोनवणे, सुखदेव भवरे, छोटू भिल, उदय भिल, धर्मा महाले, वसंत महाराज, रंजीत वळवी, भैय्या मोरे, भाऊशा पांढरे,विक्की भिल, प्रवीण भिल, मुकेश फुले, शंकर भिल, देवा वडवी, पावभा भिल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते.
0 Comments