पंचायत समिती,शिक्षण विभाग, शिंदखेडा, शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ व शिंदखेडा तालुका गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आज रोजी श्री. गो. सं. देवकर विद्यालय विरदेल येथे घेण्यात आली. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे. एस. पाटील सर होते. प्रमुख अतिथी म्हणून शिंदखेडा तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.रवींद्र चित्ते सर,कार्याध्यक्ष श्री. जे. डी.भदाणे उपाध्यक्ष श्री ए टी पाटील उपस्थित होते. सुरुवातीला प्रतिमा पूजनानंतर शाळेतील विद्यार्थिनींनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रवींद्र चित्ते यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री जे एस पाटील सरांनी विज्ञान नाट्योत्सवाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व कलागुणांची आवश्यकता आहे हे नमूद केले. शालेय जीवनापासूनच अभिनयाला किती महत्त्व आहे हे सांगून भविष्यकाळात या बद्दल किती संधी उपलब्ध आहेत याची जाणीव करून दिली. आलेल्या सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केले. प्रथम क्रमांक श्रीमंत गो.स. देवकर विद्यालय विरदेल विद्यार्थी विश्वेश दीनानाथ पाटील, लक्ष्मी प्रवीण जगताप, आयुष ज्ञानेश्वर तावडे, धनश्री नितीन पाटील, ओम जितेंद्र पाटील, सिद्धी भूषण वाघ, सार्थक किरण मोरे व भूमिका वीरेंद्र जाधव यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक माध्यमिक विद्यालय आरावे व श्री गुरुदत्त हायस्कूल वायपुर यांनी मिळवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय बेहेरे व आभार प्रदर्शन श्री. जे. डी. भदाणे यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी मा. गटशिक्षणाधिकारी डॉ. सी. के. पाटील, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री. एस. ए. कदम यांनी मार्गदर्शन केले.शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments