११ सप्टेंबर २०२३ रोजी *दिल्लीतील नॉर्थ एव्हेन्यू पार्क* येथे देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी संघटनांच्या प्रमुखांचे देशव्यापी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या देशव्यापी संघटना चर्चा सत्रात महाराष्ट्र राज्यातुन *संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती. मायाताई परमेश्वर*, राजस्थानच्या श्रीमती. शाहिदा खान, मध्य प्रदेशातील श्रीमती. योगिता कावडे, हरियाणा येथील श्रीमती. अनुपमा सैनी आणि श्रीमती. संतोष शर्मा, श्रीमती. रचना वैष्णव, श्रीमती. सीमा परवीन, श्री. सुधीर परमेश्वर व इतर संघटनांचे सहकारी उपस्थित होते.
अंगणवाडी सेविकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत या चर्चा सत्रात सर्व राज्यांनी आपले मत व्यक्त केले. या चर्चा सत्रात दिल्लीतील आगामी आंदोलनाच्या तयारीसाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
आगामी देशव्यापी आंदोलनासाठी गोवा, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथील संघटना प्रमुखांनी सहमती दर्शवून पाठिंबा दिला असून, लवकरच केंद्र सरकारसमोर आपल्या मागण्या व हक्कांबाबत मोठे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये विविध राज्यातून हजारो अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाची तारीख लवकरच आपल्याला कळविली जाईल.
तसेच दिंनाक १२ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रातील मा. सचिव कार्यालयास भेट देत आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आणि त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारकडे संघटना आपले प्रयत्न सातत्याने करत आहे. आपल्याला येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून पुन्हा *भरघोस मानधन वाढ* मिळवून घ्यायची आहे. त्यासाठी संघटना प्रयत्न करेलच. मात्र आपण देखील संघटनेची सभासद वर्गणी आणि डोनेशन व लढा निधी वेळेवर भरून संघटनेस वेळोवेळी सहकार्य करावे हि विनंती...
*हमारी युनियन...* 🤝
*हमारी ताकत...* 💪🏻
💐💐💐💐💐💐💐
💠 *आपले विनीत* 💠
श्रीमती. मायाताई परमेश्वर, श्रीमती. शुभांगी पलशेतकर, श्री. युवराज बैसाने, श्री. रामकृष्ण पाटील, श्री. दत्ता जगताप, श्री. सुमंत कदम, श्री. सुधीर परमेश्वर, श्री. अमोल बैसाने, सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते....
💐💐💐💐💐💐
0 Comments