त्यास प्रोत्साहन देणे हे कायद्याने गुन्हा आहे. विद्यासीनी माता मंदिर रंजाने शिवार, विरदेल येथे छुप्या पद्धतीने बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती दोंडाईचा शहराचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार साहेबांना मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पथक पाठवून विवाह थांबवला. विद्यासीनी माता मंदिर रंजाने शिवार हे शिंदखेडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने शिंदखेडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील साहेबांना कळवण्यात आली त्यांनी वेळीच पथक पाठवून वधु व वरांचे नातेवाईक यांना ताब्यात घेतले पोलिसांनी मुलगा व मुलीचे नातेवाईकांना बालविवाह करू नये असे मनपरिवर्तन केले आहे.तसेच त्यांच्याकडून लेखी स्वरूपात बंधपत्र ही लिहून घेण्यात आले.नंतर त्यांना सोडून देण्यात आले.या मोहिमेत सौ.पुजा ताई खडसे व दोंडाईचेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार साहेब व धमाणेचे पोलिस पाटील निलेशभाऊ पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.
0 Comments