बांधवांचे सण उत्सव एकाच दिवशी येत असल्याने सण एकोप्याने साजरा करा. धार्मिक सणाला गालबोट व विटंबना होणार नाही हयासाठी प्रत्येक विभागाचे प्रमुखांनी लक्ष देऊन उपाययोजना व सुचनेनुसार अंमलबजावणी करावी असे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. हयावेळी तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, विज वितरणचे सहाय्यक अभियंता निखिल तिनखेडे, पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला पोनि दिपक पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शिंदखेडा शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव साजरा करताना पदाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी तसेच आपल्या मंडळाची पोलिस स्टेशन ला विहित नमुन्यातील फार्म भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. विसर्जन करताना वेळेचे बंधन पाळुन मंडळाने काळजी घेऊन विसर्जन करावे. तहसिलदार श्री. सपकाळे यांनी शिंदखेडा शहर हे शांततेचे प्रतिक मानले जाते. तरीही सध्या महाराष्ट्र भर आंदोलने विविध जातिय प्रकार घडत समाजासमाजामध्ये दरी निर्माण झाल्याचे चित्र असताना हिंदू मुस्लिम बांधवांनी गुण्या गोविंदाने आपापले सण साजरा करा असे मार्गदर्शन करताना सांगितले. मुख्याधिकारी श्री. बिडगर यांनी मार्गदर्शन करताना नगरपंचायत च्या हया वर्षी घरगुती लहान गणेश मुर्ती च्या विसर्जनासाठी कृतिम तलावाची व्यवस्था मुख्य चौकाचौकात केली जाणार आहे. शक्यतो पर्यावरण विरहित गणेश मुर्ती ची स्थापना करावी तसेच गणेशोत्सवात उत्कृष्ट आरास स्पर्धा आयोजित केली असुन नगरपंचायत ला संपर्क साधावा असे सांगितले. हयावेळी माजी पं.स.सदस्य प्रकाश चौधरी, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी, भाजपा शहराध्यक्ष प्रविण माळी, जैन संघटना जिल्हा सचिव प्रा.सी.डी.डागा यांनी मनोगतातुन शहरात विविध ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत त्यासाठी वीज वितरण कंपनी ने लक्ष घालुन त्यात सुधारणा करावी जेणेकरून विसर्जन वेळी अडचणी येणार नाही, नगरपंचायत ने ही मुख्य रस्ता विशेषतः भगवा चौकापासून वरुळ रोडवर मोठमोठे खड्डे असुन तात्पुरती मुरुम टाकुन रस्ता दुरुस्ती करून घ्यावे. शहर हे शांततेचे प्रतिक असुन कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही यासाठी पदाधिकारी अधिक काळजी घेतील परंतु सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात वेगळं वळण घेत असुन पोलिस बंदोबस्त अधिक वाढवावा जेणेकरून परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. याप्रसंगी शांतता कमेटीचे सदस्य, तालुक्यातील पोलिस पाटील बंधु , भगिनी , गणेश मंडळाचे पदाधिकारी, डी.जे चालक , आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश माळी, कुणाल फुलपगारे, हेमंत पाटील, दिनेश गोसावी यांनी परिश्रम घेतले. शांतता कमेटीचे सुत्रसंचालन व आभार वरसुस येथील पोलिस पाटील संजय खैरनार यांनी केले.
0 Comments