______________________________________ _ डोंगरगाव( प्रतिनिधी )आर आर पाटील __ दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री डांगुर्णे शिवारातील शेतात उत्तम हिलाल पाटील यांच्या मालकीचे गाईचे वासरू बिबट्याने फस्त केले यासंदर्भात जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांना संबंधित शेतकऱ्याने फोन केला म्हणून प्रकाश पाटील यांनी वन विभागाचे डॉक्टर राजभोज यांना फोन करून सर्व हकीकत सांगितलेले आहे या परिसरात व डोंगरगाव परिसरात डोंगर दर्या जाम फळ धरण सोनवद धरण असल्याकारणाने पाणी आणि डोंगरांच्या गुहा असल्याकारणाने विविध वन्य प्राणी अस्तित्वात असून सध्या मात्र या चौफेर परिसरात बिबट्या या प्राण्याने धुमाकूळ घातलेला असून वन विभागाने या संदर्भात दक्ष राहणे गरजेचे असून शेतकऱ्यांमधील भीतीचे वातावरण कमी करावे अशी मागणी देखील प्रकाश पाटील यांनी केली आहे
0 Comments