Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांचा नुकताच सत्कार



सुजान नागरिक (प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे)
    शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.


     सविस्तर वृत्त असे की,माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम हे शिंदखेडा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक संघाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जुनीपेंशन उपाध्यक्ष,बालाजी पतसंस्था सदस्य सोनगीर इ.या शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यात्वाचा गौरवार्थ म्हणून आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम यांना नुकताच "आदर्श शिक्षक पुरस्कार "  रोटरी क्लब धुळे ऑफ धुळे यांच्यावतीने मा.श्री.प्रकाशही पाठक सर सुप्रसिध्द चार्टड अकाउंटट मा.श्री राहुलजी देवरे सर एज्युकेशन शिक्षण संचालक चेअरमन,व मा.श्री दीपकजी जैन अध्यक्ष रोटरी क्लब धुळे,मा.श्री विलासजी कोठावदे सर,मा.श्री जगदीश गिंदोडिया सर,मा.श्री रोहित अग्रवाल सर व मा.गजेंद्र पाटील  या सर्वांच्यासमवेत "आदर्श शिक्षक पुरस्कार "देण्यात आला...
    आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांना रोटरी क्लब ऑफ धुळे यांच्या माध्यमातून "आदर्श पुरस्कार " मिळाल्याने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासो.जे.बी.पाटील,चेअरमन,संचालक मंडळ व धुळे जि.प.खलाणे गटाचे सदस्य मा.श्री.पंकजभाऊ कदम व मित्र परिवार  तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद या सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्याध्यापक एस ऐ.कदम सर यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस अजून हार्दिक-हार्दिक शुभेच्छा! देण्यात आलेत. 
🌳🦚🌹🌹⚘⚘⚘⚘⚘🦚🌳

Post a Comment

0 Comments