Header Ads Widget

*तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत जनता हायस्कूलची जिल्हास्तरावर निवड*




   शिंदखेडा येथील एस.एस.व्ही.पी.एस कला व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत सतरा वर्ष आतील गटातून जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा यांची तालुका स्तरावर विजय मिळवत  जिल्हास्तरावर निवड करण्यात आली.
   यात ओम परदेशी शमीन खान,साईराज शिरसाठ,रेहान शेख अमीन,निखिल बाविस्कर, हर्षल भोई, गणेश अहिरे,हर्षवर्धन चित्ते,प्रेम मराठे,हर्ष पाटोळे साद शेख वाजीद ,दिवेश पवार,शितिष जयनगरकर  या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्री डी.के.सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
   विजयी संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाअध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील,उपाध्यक्ष श्री अमजद मेहमूद कुरेशी,खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे ,सचिव श्रीमती मीराताई मनोहर पाटील प्राचार्य श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments