Header Ads Widget

भडणे जि प शाळेत विद्यार्थ्यांना तृणधान्ये समावेशक आहार वाटप ,,,,,,,




प्रधानमंत्री पोषण शक्ती महिना सप्टेंबर 2023 अंतर्गत आमच्या जि. प. शाळा भडणे ता. शिंदखेडा जि. धुळे येथे आज दि.13 सप्टेंबर 23 रोजी जिल्हा शालेय पोषण आहार अधिक्षिका श्रीम. कुलकर्णी मॅडम, तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर आण्णासाहेब सी. के. पाटील, आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय सौ. शैलजा शिंदे मॅडम, तालुक्याचे गटसमन्वयक तथा आमच्या चिरणे केंद्राचे केंद्रप्रमुख आण्णासाहेब सी. जी. बोरसे यांच्या मार्गदर्शनानुसार तृणधान्य समावेशित पाककृती तयार करण्यात आली. त्यामध्ये शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना राजगिरा लाडू, भगरशीरा, जिराभात, फोडणीचे वरण,कांदा, काकडी, टमाटे, मिक्स सलार्ड आणि चविष्ट खमन दुपारच्या मध्यान्ह भोजनात देण्यात आले. या कामी स्वयंपाकीण ताई श्रीम. लताताई बोरसे व श्रीम. रेखाताई बोरसे तसेच माझे सहकारी श्री. माधवराव भामरे पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी शा. व्य. समिती अध्यक्ष श्री रामराव पाटील उपाध्यक्ष श्री देविदास कोळी, भडणे गावाचे आदर्श पो. पा. युवराज माळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments