महाराष्ट्र पोलीस देशाची शान असलेली पोलीस आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात एक ब्रीदवाक्य लिहिलेले असते ते म्हणजे" सद्रक्षणाल खलनिग्रहणाल याचा अर्थ अनेकांना माहित नाही. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करतील आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी वचनबद्ध असतील. परंतु सज्जन नागरिक पोलीस स्टेशनला काम असुन येत नाही याचा अनुभव दोंडाईचाकर नागरिकांना येतो दोंडाईचा शहर म्हणजे दोन नद्यांच्या संगमावर बसलेले गाव राजकीय गट दोन असुन दोन्ही गट एकमेकांचे कट्टर विरोधक शहराचा विस्तार वाढला परंतु राजकीय ईच्छाशक्ती वाढली नाही शहरात पूर्वीपासून वरवाडे भागात पोलीस स्टेशन आहे. सोबत पडकी पोलीस लाईन अर्थात पोलीसांची सरकारी घरे जुनी कौलारु पडक्या अवस्थेत पावसाळ्यात गळती लागते. आणि जवळच पोलीस अधिकारीचा सरकारी बगंला तोही भुतबगंला सारखा या ठिकाणी पोलीस अधिकारी राहत नाही शहराचा विस्तार स्टेशन भाग आणि काॅलणी परिसरात जास्त वाढला आहे. पुर्वी स्टेशन भागात बस स्टॅण्ड जवळ एक पोलीस चौकी होती. त्या पोलीस चौकीचे दोन वेळा उदघाटन होऊन एकदाही पोलीस थांबले नाहीत नंतर ती चौकी अतीक्रमणात जमिनदोस्त झाली त्यानंतर बस स्थानकात बैठक व्यवस्था केली परंतु पोलीस त्याठिकाणी बसत नाही याचा परिणाम शहरात वाढती गुन्हेगारी चोऱ्या घरफोड्या, लुटमार, अवैध्य धंदे अशा अनेक घटना घडतात. जिल्ह्या पेक्षा शहरात चोरीचे प्रमाण जास्त आहे. काही चोऱ्या दाखल होतात तर काही चोऱ्या बेदखल होतात चोऱ्यां मुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. पुर्वी दुर्गेश तिवारी होते त्यावेळी परिस्थिती गंभीर होती नंतर श्रीराम पवार आलेत सुरुवातीला थोडासा दिलासा मिळाला परंतु कोणते ही अधिकारी नवीन जागेवर बदली होऊन आलेत का? म्हणजे फस इम्प्रेशन विथ लास्ट इम्प्रेशनचा हा प्रभाव टाकावाच लागतो नंतर सर्व अलबेल म्हणजे नवीन अधिकारी बदली होऊन आले का? नव्याचे नऊ दिवस दिखाऊ कार्यवाही होते. शहरातील अनुभव पोलीसांची भुमिका आरोपी आणि फिर्यादींना सारखी असते चोरीची फिर्याद दाखल करण्यासाठी येणाऱ्या फिर्यादीलाच जास्त प्रश्न विचारुन हैराण करण्याची कला अवगत आहे हा अनुभव माझ्यासह अनेकांना आला असेल चोरी झालेला माल एक लाख रुपयांचा असेल तर पोलीस त्या मालाची किंमत स्वताच्या मर्जी प्रमाणे लावतात जसे व्यापारी अनुभव घेतलेले पोलीस आहेत फिर्यादीला आरोपी समजून वागणूक मिळते यासाठी सरकारने पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत परंतु त्यांची तपासणी करणार कोण? चोरीचा तपास करतांना चोर सापडेल की? नाही सांगता येत नाही पण चोरीचा माल घेणारा बहुतेक सापडतो चोरीचा माल मिळो का? न मिळो माल मात्र मिळतो चोरांचा बंदोबस्त होत नाही म्हणून मोटारसायक आणि फोर व्हीलर गाडी वाल्यांची धरपकड सुरु झाली असुन लायसन्स नाही,ट्रिपलसीट चालक सापडले तर दंड वसूल कार्यवाही होते वाहन धारकांना सिस्त लावण्यासाठी कार्यवाही झालीच पाहिजे परंतु त्यासोबत चोरांनाही पकडणे गरजेचे आहे. चोरीचे प्रमाण कमी करुन सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतील परंतु पोलीसांचे प्रथम उत्तर म्हणजे संख्याबळ अभावी तपास कमी आहे जर चोऱ्या,घरफोड्या थांबवायच्या असतील तर पुरेसे पोलीस संख्याबळ असणे आवश्यक आहे....
✍️✍️✍️ अहिल्या न्यूज मिडिया*साभार
0 Comments