शिंदखेडा ( यादवराव सावंत )-- येथील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
शिंदखेडा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून केंद्रीयमंत्री मा ना श्री रामदासी आठवले साहेबांना सविनय निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले शिंदखेडा शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसील कार्यालया जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळा दिनांक 14/10/1963 पासून बसविण्यात आला आहे परंतु परिसरात कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही या परिसरा कडे अनेक वर्षा पासुन दुर्लक्ष केले जात आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विद्येचे माहेरघर आहे त्यांचा पुतळा पाहून जण माणसात अभ्यास करण्याची प्रवृत्ती बळावेल आणि आज त्यांच्या अनमोल विचारांची तरुण पिढीला गरज आहे.
सदर पुतळ्याचे सुशोभीकरण झाल्यास शिंदखेडा शहराच्या सौंदर्यात मोठी भर पळेल असे सविनय निवेदनाद्वारे केंद्रीयमंत्री मा ना डॉ रामदासजी आठवले यांच्याकडे विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत
संजय भाऊ पाटोळे जिल्हा उपाध्यक्ष, रामभाऊ माणिक उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र RPI, कैलास आखाडे तालुकाध्यक्ष शिंदखेडा RPI व RPI चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments