Header Ads Widget

*शिंदखेडा येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये ʻ राष्ट्रीय क्रीडा दिवस ʼ निमित्त कबड्‌डी स्पर्धा संपन्न*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती २९ ऑगस्ट ही २०१२  ʻ राष्ट्रीय क्रीडा दिवस ʼ म्हणून साजरी करण्यात येते. त्यानिमित्ताने शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित गर्ल्स हायस्कूलमध्ये ʻ कबड्‌डी ʼ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
          स्पर्धेचे उद्‌घाटन संस्थेचे संचालक श्री. एम. वाय. पवार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक श्री. जे. पी. पाटील, सर्व शिक्षक बंधुभगिनी उपस्थित होते. इयत्ता ८वी ते १०वीच्या विद्यार्थिनींचे एकूण नऊ संघ करण्यात आले होते. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. इयत्ता ९वी ʻबʼ चा वर्ग विजेता तर १०वी ʻअʼ चा वर्ग उपविजेता ठरला. दोन्ही गटांना क्रीडाशिक्षक श्री. के. के. चौधरी सरांकडून विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडाशिक्षक श्री. के. के. चौधरी, श्री. ए. यु. मराठे सरांनी प्रयत्न केले. श्री. के. एस. परदेशी व श्री. सी. एस. पाटील सरांनी स्पर्धेचे पंच म्हणून भूमिका पार पाडली तर वेळाधिकारी म्हणून श्री. डी. बी. जगताप सर यांनी काम पाहिले. श्री. व्ही. आर. महाले सरांनी हिंदीतून समालोचन करून स्पर्धेत रंग भरले. सर्वच विद्यार्थिनींनी कबड्‌डी स्पर्धेचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments