देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले केंद्रातील भाजपा सरकार, बेईमानीने फोडाफोडीच्या राजकारणातून निर्माण झालेले महाराष्ट्रातील राज्य सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णतः अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी व कामगार विरोधी धोरणे, सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, देशाची लोकशाही व संविधान संपविण्याचे कट-कारस्थान यामुळे जनतेच्या मनात प्रचंड संताप आहे. महिलांवरील अत्याचार व वारंवार घडत असलेल्या जातीय-धार्मिक दंगलीमुळे सर्वसामान्य जनता भयभयीत झालेली असून त्यांच्या मनात राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड चीड तयार झालेली आहे. असंतोष मनात खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर लोकभावना जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यात पदयात्रा काढण्याबाबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय *ना. श्री मल्लिकार्जुन खरगे* साहेब यांच्या आदेशानुसार व *खा. राहुलजी गांधी* यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष *आ. श्री नानाभाऊ पटोले*
0 Comments