Header Ads Widget

🚩🚩 *महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना.* 🚩🚩 ✨⚡ *महीला व बाल विकास मंत्री, मा. आदिती ताई तटकरे यांचा सत्कार सोहळा अंगणवाडी कर्मचारी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न* ✨⚡




       आज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली, श्रीवर्धन रायगड येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्यात प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती,  महीला व बाल विकास मंत्री, मा. ना.  आदितीताई तटकरे यांनी उपस्थित राहून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. 


        संघटनेच्या अध्यक्षा माया परमेश्वर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या स्थानिक प्रश्नापासून ते देश पातळीवरील सर्व प्रश्नांपर्यंत सविस्तर माहिती देत. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्या बाबत तात्काळ उपाययोजना राबवाव्याबाबत मा. मंत्री महोदयांना विनंती केली. 
        मा. महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,

➡️ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन मोबाईल मिळतील. मोबाईल रिचार्ज पैशांमध्ये ही वाढ होणार आहे.

➡️ मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियमित अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतर करण्याबाबत चा प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळामध्ये चर्चेसाठी घेतलेला आहे. व लवकरच केंद्र शासनाकडे पाठवला जाईल.

➡️ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळावी याबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

➡️ कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बहुमूल्य योगदान दिलेले आहे. त्यांनी त्याकाळी केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे याबाबत देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत.

➡️ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या पूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर योजना लवकरच आम्ही घेऊन येणार आहोत.

➡️ राज्यातील इतर खात्यांच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात १७ हजार कर्मचाऱ्यांची भरती येत्या काळात महीला बाल विकास खात्यामार्फत केली जात आहे.

➡️ ऑनलाइन काम करणाऱ्या महाराष्ट्र भरातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड प्रथम क्रमांकावर आहे आणि तो तसाच प्रथम क्रमांकावर असावा याबाबत देखील त्यांनी आशा व्यक्त केली.
          शेकडो कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचारी मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला...  जिल्हा कमितीतील नांजनिन कर्वेकर, तेजश्री जाधव, शुभांगी पलशेतकर, वनश्री गायकवाड, प्रमिला घाडगे, इंदिरा ठाकूर, शीतल पाटील, रंजना संसारे, रश्मी बने, नंदा सुतार, शुभांगी कुंभार, अंजली जाधव यांच्या योगदानामुळे आजचा मेळावा यशस्वी झल्याबदल सर्वांचे अभिनंदन...

सदर अंगणवाडी कर्मचारी याचा मेळावा श्रीवर्धन रायगड जिल्हा येथे पार पडला सदर मेळाव्यास राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे उपस्थित होत्या असे पत्रक संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे कळवले आहे मो 9834380339

💐💐💐💐💐💐💐💐

Post a Comment

0 Comments