नरडाणा--*राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य ललित दादा वारुळे यांच्या नेतृत्वात आज नरडाणा विद्युत वितरण बोर्डावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला गेल्या भरपूर दिवसापासून पावसाने दांडी मारल्या कारणाने शेतकरी हा खूप हवालदिन झाला आहे आणि पीकही जळायला लागली आहे तरी शेतकऱ्यां जवळ पाणी असून पण एमएसईबीचा भोंगळ कारभारामुळे लाईट वेळेवर न दिल्यामुळे किंवा आठ तास ऐवजी फक्त तीन तास दोन तास लाईट शेतकऱ्यांना देता यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय संतापाची लाट होती आणि आज शांततेच्या भक्ती भावाच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले व एम एस ई बी च्या साहेबांनी आश्वासन दिले की शेतकऱ्यांना याच्यापुढे आठ तास लाईट ही वेळेवर दिली जाईल त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं त्यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे कलमाडी सरपंच सोनू दादा राष्ट्रवादीचे गट प्रमुख पंकज सोनवणे कामखेडा डॉ.प्रशांत बागुल दिनेश बच्छाव अजय भामरे दबाशी माजी सरपंच पंकज पाटील प्रशांत पाटील कपिल पाटील डॉ आकाश पाटील पप्पू बोरसे गोविंद जाधव भटू दादा भाऊ उमेश पाटील श्याम पाटील*
0 Comments