Header Ads Widget

शिंदखेडा--*आरोग्य विषयक चर्चासत्र संपन्न*




शिंदखेडा-- उज्वल शैक्षणिक संकुलात श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर यांचा संयुक्तिक विशाखा समिती अंतर्गत विद्यार्थिनींचे आरोग्य व आरोग्य विषयक समस्या याविषयी


चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदिरच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती ए.के. माळी होत्या.  
महिला शिक्षिकांनी विद्यार्थिनींना त्यांचं आरोग्य व आरोग्य विषयक समस्या याच्यावर चर्चा करून त्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सर्व महिला शिक्षिका  व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments