Header Ads Widget

*डॉक्टर देशमुख गटाचे राजकीय निर्णय घृनास्पद, लज्जास्पद, अपमानास्पद* *भाजप सरकार विरोधातील काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत अजितदादा राष्ट्रवादी गटाचे डॉक्टर देशमुख गटाचा सहभाग*




 *डॉक्टर देशमुख बंधू भाजपसोबत जाणाऱ्या अजितदादा राष्ट्रवादी गटात की महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या गटात..... जनतेत संभ्रम*

      दोंडाईचा शहरातील डॉक्टर देशमुख गट यांच्या राजकीय निर्णयाबद्दल अनेक शंका कुशंका उपस्थित होत आहेत. राजकीय पटलावर कधीच स्थिर न राहणाऱ्या विचारवंत देशमुख गटाने तत्वहीन, दिशाहीन निर्णय घेऊन दोंडाईच्या शहरातील जनतेत संभ्रम निर्माण केला आहे. त्या संभ्रमावस्थेतूनच त्यांच्याबद्दलचा विश्वास देखील गमविला जात आहे त्याचे भान देखील त्यांना राहीले नाही. हे निर्णय ते स्वतः आपल्या    बुद्धीचातुर्याने घेत आहेत की कोणा दोन-तीन स्वार्थी कार्यकर्त्यांच्या इशारावर घेत आहेत याबद्दल अनेक जाणकारांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
      एकेकाळी राजकीय पटलावर जनता हितार्थ तत्त्वज्ञानावर निर्णय घेणारे डॉक्टर देशमुख गट यांच्या अनेक निर्णयावर  खेद व्यक्त होत आहे. मागील काळातील अनेक निर्णय चुकले असतील परंतु त्यातून डॉक्टर देशमुख गटाचा राजकीय  आणि सामाजिक फायदा झालाय तर काही राजकीय नेत्यांची राजकीय आयुष्य देखील बरबाद झाले आहे. नुकतेच डॉक्टर देशमुख गटाने भाजप सोबत जाणाऱ्या राष्ट्रवादी अजित गटात सामील होऊन दिशाहीन राजकारण केले. कारण की अजितदादा राष्ट्रवादी गट थेट भारतीय जनता पार्टीत सामील झाला आणि दोंडाईचा परिसरात भाजपचे करते धरते आमदार जयकुमार राऊळ हे आहेत आणि त्यांच्यासोबत अजितदादा राष्ट्रवादी गटात राजकीय पटलावर सामील होऊन डॉक्टर देशमुख गटाचे बुद्धीचे दिवाळे निघाले आहे की काय? असा प्रश्न अनेक कार्यकर्ते व जाणकारांच्या मनात उपस्थित होत आहे. डॉक्टर देशमुख गटाने भाजप सोबत जाणाऱ्या अजित दादा राष्ट्रवादी गटात सामील होऊन शाहू, फुले, आंबेडकर विचारसरणीशी गद्दारी तर केलीच परंतु त्यांच्यासोबत राहणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची राजकीय होळीच केली. डॉक्टर देशमुखांच्या निर्णयासोबत फरफटत जाणाऱ्या कार्यकर्त्यांची राजकीय, सामाजिक आयुष्य बरबाद होत आहे याचे भान देखील डॉक्टर देशमुख बंधूंना नाही याची खंत अनेकांना होत आहे.
      नुकतेच ज्ञानेश्वर भामरे यांच्यासोबत अजित दादा राष्ट्रवादी गटात डॉक्टर देशमुख बंधूंनी प्रवेश करून आम्ही विकासासाठी भाजपाच्या मांडीवर बसलो आहे असा संदेश दिला त्याची अनेकांना खंत व्यक्त केली परंतु अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी गळचेपीने का होईना त्या निर्णयाचे स्वागत केले.
     काल परवाच भाजपच्या हुकूमशाही, दंडूकशाही, जुलमी राजकारभारा विरोधात काँग्रेसचे आमदार कुणाल बाबा पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनसंवाद यात्रेत डॉक्टर देशमुख गटाने शंभर टक्के सहभाग नोंदविला आणि संपूर्ण दोंडाईचा शहरात व परिसरात डॉक्टर रवींद्र देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद यात्रेत सहभाग नोंदवून गावात पत्रके वाटली आणि भाजपच्या विरोधात जन आक्रोश केला.
      डॉक्टर देशमुख गट एकीकडे भाजपसोबत जाणाऱ्या अजितदादा राष्ट्रवादी गटात सामील होऊन भाजपच्या ध्येय धोरणाचे स्वागत करतात तर एकीकडे भाजपाच्या जुलमी ध्येयधोरणा विरोधात काँग्रेस तर्फे काढण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेत सहभाग नोंदवून भाजपाचा निषेध करतात. डॉक्टर देशमुख बंधूंना या निर्णयाद्वारे काय संदेश द्यायचे आहे... डॉक्टर देशमुख बंधू भाजप सोबत जाणाऱ्या महायुतीत अजितदादा राष्ट्रवादी गटासोबत की महाविकास आघाडीच्या काँग्रेस सोबत हा प्रश्न उपस्थित होत आहे. निर्णय घेताना ठाम आणि विश्वासार्हता पूर्ण निर्णय घेतला पाहिजे अन्यथा जनतेच्या मनात असलेले राहीले सुरले स्थान संपूर्णतः नायनाट होईल याचे भान देखील डॉक्टर देशमुख बंधूंना नाही याची खंत अनेक जानते जाणकार व्यक्त करीत आहेत. डॉक्टर देशमुख बंधूंनी घेतलेले दिशाहीन निर्णय हे त्यांचे स्वतःचे राजकीय, सामाजिक आयुष्य तर बरबाद तर करीतच आहेत परंतु त्यांच्यासोबत त्यांच्यावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचे भविष्य देखील बरबाद करीत आहे.
   डॉक्टर देशमुख बंधूंनी घेतलेले चुकीचे राजकीय निर्णय हे त्यांची व्यक्तिगत घरापुरता मर्यादित नसून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची आयुष्याची राख रांगोळी करणारे आहे याचे भान ठेवावे तूर्त एवढेच....

                  *आपला*
           *राकेश प्रल्हाद पाटील*
*मा. नगरसेवक तथा बांधकाम सभापती*

Post a Comment

0 Comments