दोंडाईचा शहरातील धुळे रस्ता लगत नामांकित तंत्रशिक्षणसंस्था अर्थात अहिंसा पाॅलिटेक्निक डिप्लोमा या शाळेत झालेल्या उन्हाळी २०२३ परिक्षेच्या वेगवेगळ्या विषयांच्या पेपर मध्ये एकुण ६७२ विद्यार्थांचे मासकाॅपी प्रकरण घडले होते या मासकाॅपी प्रकरणाची चौकशी सुरु होती. गेल्या जुलै महिन्यात अहिल्या न्यूज मिडिया बातमी पत्रात दोंडाईचा शहरातील नामांकित शाळेत मासकाॅपी प्रकरण घडले अशी बातमी पहिल्यादा आम्ही दिली होती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून तक्रारी केल्या होत्या त्या बातमी व तक्रारीची गंभीर दखल तंत्रशिक्षण मंडळाने घेतली आहे त्यामुळे मासकाॅपी प्रकरणाची चौकशी सुरु होती त्या चौकशी मध्ये विद्यार्थी दोषी असल्याचा ठपका ठेवत विद्यार्थ्यांचे वर्षे वाया गेले परंतु फक्त विद्यार्थींना दोषी ठरवून चालणार नाही. यासाठी आम्ही पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अहिंसा पाॅलिटेक्निक संस्थेला ही चौकशी मध्ये दोषी ठरविले असुन संस्थेला १ लाख रुपये दंडाची शिक्षा आणि परिक्षा केंद्र रद्द करण्यात आले असून सोबत ब्लॉक पर्यवेक्षक, प्रभारी परीक्षा अधिकारी आणि परिक्षा नियंत्रण यांचीही चौकशी सुरु आहे. या मासकाॅपी प्रकरणाचा पाठपुरावा करुन भविष्यात असे गंभीर प्रकार घडू नये यासाठी पारदर्शक परिक्षा झाल्या पाहिजे आणि चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत हाच उद्देश ठेऊन पाठपुरावा सुरु होता. या प्रकरणात फक्त विद्यार्थ्यांना शिक्षा मिळाली असती तर हा एकतर्फी विद्यार्थांवर अन्याय होता म्हणून आम्ही मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीची मागणी तंत्रशिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे. हा गंभीर प्रकार असून विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करावा यासाठी प्रयत्न करणार आहे.
✍️✍️✍️ अहिल्या न्यूज मिडिया* साभार
0 Comments