*बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते असं मानणारा शेतकरी बांधव आणि वाळलेला कडबा गोड मानुन मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारा बैल यांच्यातील नात्याचे बंध अधोरेखित करणारा शेतकऱ्यांचा सण.*
*आपल्या लाडक्या सर्जाराजाला पुरणपोळीचा घास चारुन त्याच्या पाठीवरुन हात फिरवणारी घरची मायमाऊली आणि जिभेने तिचे हात चाटुन माया दाखवणारा बैल यांच्यातील ममतेचं नातं सांगणारा सण.*
*ओढ्यावर आपल्या दोस्ताला घासुन पुसुन अंघोळ घालुन त्याच्या शिंगांना मस्तपैकी हिंगुळ, बेगडं, गोंडे लावणारा बारक्या आणि शांतपणे छोट्या मालकाच्या मनासारखं सजवुन घेणारा बैल यांच्यातील दोस्ती जपणारा सण.*
*"बैलपोळा"*
*माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या अगदी मनापासुन शुभेच्छा...!!*
✌🏻🌍⛈💪🏻💐😊
0 Comments