Header Ads Widget

*नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.*




🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*ज्ञानोपासक शिक्षण मंडळी दोंडाईचा संचलित नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध पॅथाॅलॉजिस्ट डॉ. चेतन काशिनाथ पाटील यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉ. नानासाहेब हेमंतरावजी देशमुख, संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ. बापूसाहेब रविंद्रजी देशमुख, संस्थेचे सचिव  मा.श्री. अमित दादा पाटील, सचिव मा. सौ. जुईताई देशमुख-पाटील,  संचालिका सौ. अनिताताई देशमुख,  प्रशासकीय अधिकारी मा. श्री. गणेश भाऊसाहेब यांच्या हस्ते      ऑलिंपियाड स्पर्धा, एन एम एम एस परीक्षा, विज्ञान प्रदर्शन   यात राज्यस्तरावर नैपुण्य मिळविलेले गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या कवायती सादर केल्या. इ ९ वीच्या विद्यार्थिनींनी ध्वजगीत सादर केले..  कार्यक्रमास  सेवानिवृत्त प्राचार्य श्री. ए. डी. पाटील, सेवानिवृत्त प्रा. श्री. एन. डी. पाटील,  माजी सभापती श्री. भूपेंद्र धनगर, सामाजिक कार्यकर्ते श्री. जितुभाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकभाऊ सोनवणे, श्री. आबिद शेख, विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. पाटील, उपप्राचार्य श्री. ए. जी. पाटील, वसुधा पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती अंशुल कपुर मॅडम,  श्रीमती पी. बी.  बागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. लोहार,  पर्यवेक्षक श्री. सी. एस. पाटील,  उच्च माध्यमिक विद्यालयाचे समन्वयक श्री. डी. एम. चौधरी, श्री. बी. एच. पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. एस. बी. पाटील,  श्री रमाकांत चव्हाण व श्री एन. पी. बागल यांनी केले.*

Post a Comment

0 Comments