सुजान नागरिक प्रतिनिधी-श्री.सी.जी.वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे विविध ठिकाणी "७५वा प्रजासत्ताक दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
१]माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित,अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात- मा.संस्थापक अध्यक्ष आदरणीय आबासो.श्री.जे.बी.पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
२]जि.प.केंद्र शाळेत - सेवानिवृत्त उपअभियंता श्री अरुण भाईदास पाटील .यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
३]ग्रामपंचायत-आयकर विभागात निवड झालेले प्रशांत विकास झालसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर
४]विविध कार्यकारी विकास सोसायटीत - श्री किरण विजय झालसे.(सोसायटी चेअरमन)यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर अगस्तॠषी महाराज-ज्ञान मंदिर चौकात सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी प्रथमतः -अंगणवाडी,जि.प.प्राथमिक केंद्र शाळा व अगस्तमुनी माध्य विद्यालय इ.च्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त-भाषणे,देशभक्तीपर गीत,भजन,गवळण,एकांकिका,नाटिका,डान्स इ.कार्यक्रमात सहभाग,त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा व गावातील विविध क्षेत्रात अधिकारीपदांवर विराजमान झालेल्या मुला-मुलींचे गुणगौरव व सेवानिवृत्त व्यक्तींनी केलेल्या उल्लेखनीय कार्य इत्यादी व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच गं.भा.गोजरबाई पुंजू माळचे व प्रमुख पाहुणे- मा.आबासो.श्री.जे.बी.पाटील,पोलीस पाटील-श्री.भाऊराव कौतिक पाटील,
उपसरपंच-विजेंद्र छबिलाल पाटील उर्फ सोनुभाऊ झालसे,बापूसो.श्री रमेश पुंडलिक कदम(संचालक),
आबासो.दंगल डोंगरपाटील,व ग्रा.पं.सदस्य-
श्री.युवराज पाटील उर्फ पिन्टूभाऊ,
दिलभर पाटील,घनःश्याम पाटील,
ग्रा.पं.सदस्य,केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख-श्री आर जी राजपूतसर व विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम,ग्रापंचायत-ग्रामसेवक श्री संजय पाटील भाऊसाहेब,सोसायटीचे सेक्रेटरी भाऊसाहेब व ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या मनोभावनेतून चि.प्रशांत विकास झालसे यांचा गुणगौरव करण्यात आला व सेवानिवृत्त तात्यासो अरूण भाईदास पाटील यांना शाल श्रीफल देवून नागरी सत्कार करण्यात आला.
तद्नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम सर यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी व बक्षीस देणारे दाते तसेच शासनाकडून मिळणार्या विविध लाभांश विषयी व गावातील नवयुक्त पदावर विराजमान अधिकारी-१] प्रितेश शांताराम कदम,२]माजी विद्यार्थीनी कु.जयश्री राजेंद्र पाटील,३]आकाश पाटील या तिन्ही व्यक्तींच्या प्रेरणायुक्त भावना व सेवानिवृत्त कार्यशैली भावदर्शक वर्णन तसेच सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,शारीरिक,बौद्धिक,धार्मिक,सांस्कृतिक व इतिहासकालिन राजनैतिक इ.विषयी व नवयुक्त संकल्पना भावदर्शन व कार्यक्रमास बक्षीस देणारे व गोडधोड- चाॅकलेट पाकीट देणारे दाते इ.महत्त्व पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार-श्री.पी.आर.पाटील सर यांनी मानले.व या राष्ट्रीय कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी,ग्रामस्थमंडळी,,अंगणवाडी कर्मचारीवृद व प्राथमिक केंद्र शाळा मुख्याध्यापक, शिक्षकबंधु-भगिनी व माध्य.विद्यालय मुख्याध्यापकसाहेब,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
0 Comments