Header Ads Widget

*प्रजासत्ताक दिनानिमित्त व बाळासाहेब ठाकरे यांच्या भगवा सप्ताह निमित्त जेष्ठ नागरिकांना धोतर कुरता वाटप करुन साजरा*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --
दिनांक २६ जानेवारी २०२४ वार शुक्रवार रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिवसा निमित्त महाराष्ट्र राज्यातील खान्देशी भागातील धोतर कुर्ता हा पोषाख जास्त करून वापरला जात होता परंतु या बदलत्या युगात तो नष्ट होताना दिसत आहे आता फक्त जेष्ठ नागरीक वापरुन जुन्या संस्कृती जपत आहेत 
आपल्या भारतातील प्रत्येक गावात स्वातंत्र्य युगाचे 1925 ते 1940 च्या युगात जन्मलेल्या ज्यांनी इंग्रज काळातुन स्वातंत्र्य काळ पाहीला ज्यानी दुष्काळ सहन केलेत असे सर्वात अनुभवी व्यक्ती इमानदार समजदार संस्कारांनी भरलेले आजोबा जे अजुन आहेत जी काळाची शेवटची पिढी असुन 
त्यांना मान देत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवसाच्या शुभ दिवस व हिन्दुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या भगवा सप्ताह तसेच याच दिवशी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व आदिवासी वाल्मिकीलव्य सेना संस्थापक प्रमुख श्री शानाभाऊ सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते शिंदखेडा तालुक्यातील आच्छी गावात जेष्ठ प्रौढ व्यक्ती कामाजी दाजमल ईशी, देवा लकडु भिल, तुकाराम तुळशीराम ईशी,बारकु गोरख मोहणे, सखाराम नागो भिल, देवराम मन्साराम ईशी,चंद्रा यादव भिल यांचा पोशाख धोतर - कुर्ता, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम नवे आच्छी गावातील तंटामुक्त अध्यक्ष रावसाहेब ईशी व समाज सेवक रविंद्र मोहणे यांनी आयोजित केला त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, रावसाहेब ईशी, रविंद्र मोहणे, सखाराम ईशी,मिलिंद अहिरे बळीराम ईशी, विजय ईशी सह अनेक गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments