आले.अध्यक्षस्थानी माजी आमदार तात्यासाहेब रामकृष्ण पाटील होते. हयाप्रसंगी उद्योजक मनोहर भोजवाणी ,किशोर अहिरराव ,नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, भाजपा शहराध्यक्ष ॲड. विनोद पाटील ,माजी नगराध्यक्ष दिपक दादा देसले ,माजी पंचायत समिती सभापती प्राध्यापक सुरेश देसले ,विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी , माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख ,नगरपंचायत मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रशांत बिडगर, आदिवासी काँग्रेस सेल जिल्हा अध्यक्ष दिपक दादा अहिरे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे ,जनता विदया प्रसारक ज्येष्ठ संचालक गोरख राघो पाटील व अध्यक्ष मनोहर पाटील, माजी उपकोषागार अधिकारी देवेंद्र बोरसे, विविध कार्यकारी सोसायटी व्हाईस चेअरमन बन्सीलाल बोरसे , सतिष चोरडिया , ॲड. अरविंदकुमार मंगासे , राहुल महिरे , धनराज वाघ ,विलास संदानशिव, इकबाल तेली ,सुनिल बोरसे, अशोक बोरसे यांसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सतिष चोरडिया यांनी करताना सर्वांना भावुक केले. कै.सुरेश मोरे हे पितृछत्र हरपल्याने श्रीमती आईसाहेब कलाबाई मोरे यांनी सहा वर्षाचा विजय व आठ वर्षाचा अनिल सह एक मुलीचा सांभाळ केला. अतिशय कष्टमय ,संघर्ष मय जीवन जगताना अनेक ठोकर खाल्ली. पण खचुन न जाता नवीन विश्व निर्माण केले. त्याचे आज विजय पॅलेस च्या नवीन वास्तुचे प्रतिक आहे. वरुण व संविधान यांनी देखील इंग्रजीत मनोगतात संघर्षातून यश कसे मिळाले हे सांगितले. विजय मोरे यांनी आपल्या जीवनात आलेले प्रसंग सांगताना शहरातील अनेक ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीचे सहकार्याने मी हा प्रवास सुखाचा केला. हया वास्तुला लागलेल्या प्रत्येक वीटवर त्यांचे नाव आहे.वास्तूमध्ये सोळा सिट असुन आठ एसी तर आठ सर्वसाधारण आहे. हयाचा वापर सुयोग्य होईल. तेही प्रसंग सांगताना अश्रू अनावर झाले .हयाप्रसंगी दिपक अहिरे यांनी मोरे परिवाराकडून उभारलेली वास्तू प्रेरणादायी असुन जिवनात प्रगतीला शाटकट नसतो फक्त मेहनत, जिद्द, चिकाटी आवश्यक असते. ती मोरे परिवाराकडून पाहायला मिळाली. , भाऊसाहेब नारायण पाटील यांनी जिवनात तीन गोष्टीचा उल्लेख करताना पहिला अपमान ,दुसरा रस्त्यावर चालतांना पायाला टोचणारे काटे ,तिसरा डोक्यात टुचणाऱ्या सुया हया ज्यांनी सहन केल्या, अनुभवतो तोच यशस्वी होतो.संघर्षातून मोरे परिवार इथपर्यंत पोहोचला यासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. तात्यासाहेब रामकृष्ण पाटील यांनी प्रत्येक सामाजिक, राजकीय, उद्योजक संघर्षातून उत्कर्षाकडे वाटचाल करुन यशस्वी होते.स्व.रमेश मोरे यांचे दोन्ही भावंडे व बहिणीला पितृछत्र जरी मिळाले नसेल तरी आई कलाबाई मोरे खंबीरपणे उभी राहुन काबाडकष्ट करुन संसार सुखाचा झाला. हया परिवाराचा संघर्ष आपण सर्वांनी पाहिला आहे. नक्कीच मोरे परिवाराचे संघर्ष, मेहनतीला आज सुखाचा दिवस उजाळला आहे.जिद्द, चिकाटीच्या जोरावर मोरे परिवार शिखरावर पोहचला आहे असे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन दिनेश मोरे तर अनिल मोरे व विजय मोरे यांनी आभार मानले.
0 Comments