Header Ads Widget

*आरक्षण लढा जिंकल्याने शिंदखेडा येथे मराठा समाजाचा जल्लोष*



            शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - राज्य सरकारने सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा अदयादेश काढल्यानंतर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिंबु पाणी देवुन सोडविले. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचा आरक्षण लढा यशस्वी झाल्याने शिंदखेडा येथील मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीवर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. उपस्थित मराठा समाजबांधवांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. त्यानंतर शिवाजी चौफुलीपासुन डिजेच्या तालावर नृत्य करत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक दरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ' एक मराठा लाख मराठा ' ' छत्रपती शिवाजी महाराज की जय ' ' जय भवानी जय शिवाजी ' ' मनोज जरांगे पाटील जिंदाबाद ' अशा घोषणांनी शहर ,परिसर दणाणले होते. सदर मिरवणूकीची भगवा चौकात सांगता करण्यात आली. हयाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी मनोगत व्यक्त केले. हया मिरवणुकीत मराठा समाजाचे बबलू मराठे ,विनायक पवार , दादा मराठे, शेरा मराठे, महेंद्र मराठे ,अनिल मराठे,भुषण मराठे, जीवन मराठे , भुषण पवार यांसह शिंदखेडा शहरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments