*(दोंडाईचा बातमीदार प्रदीप जाधव*) अर्ध्या दशकाहून अधिक काळ संघर्षाला आज अखेर विशेष अध्यादेश काढून पूर्णविराम मिळाला. दोंडाईचा शहरातील शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपतींना अभिवादन करत "मनोज जरांगे जिंदाबाद "च्या घोषणा देण्यात आल्या व फटाक्याची आकाशबाजी करण्यात आली. यावेळी दोंडाईचा नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते विजय मराठे पत्रकार दिलीप भाऊ शेळके माजी नगरसेवक छोटू भाऊ मराठे देविदास सावंत ,विष्णू सावंत, हरेश वाळूज, लोटनमराठे ,अशोक कदम ,छोटू कदम, एडवोकेट प्रमोद मराठे, पंकज चोळके, संजय वाळूज अभिजीत मराठे ,शिवा मराठे , मनोज डोंगरे ,जितू डोंगरे ,सुनील डोंगरे ,सोनू भट, गजेंद्र साळुंखे, योगेश मराठे, आकाश मराठे ...सर्व दोंडाईचा शहर सकल मराठा संघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी एडवोकेट एकनाथ भावसार व विजय मराठे यांनी राज्य शासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील त्यांनी आभार मानले.
0 Comments