Header Ads Widget

*नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा येथे सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न*




दोंडाईचा --विद्यार्थ्यांच्या शिव मावळ्यांच्या डान्स च्या कार्यक्रमाने लक्ष वेधले. विद्यार्थी बालकलाकारांनी सादर केला अद्वितीय कलाविष्कार
       दि२७जानेवारी२०२४शनिवार रोजी नूतन माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान कनिष्ठ     महाविद्यालय  दोंडाईचा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, 
कार्येक्रमाचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी कामगार मंत्री मा. नानासाहेब डॉ.हेमंतरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर , ज्ञानोपासक संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष मा.डाॅ.बापूसाहेब  रवींद्रजी  देशमुख , संचलिका सौ. ताईसाहेब अनिता देशमुख,  सचिव मा.  अमित दादा पाटील,  दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व संस्थेच्या सचिव मा. सौ  जुई ताई पाटील, शिवसेने चे तालुका उपप्रमुख श्री शैलेश भाऊ सोनार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ पूजाताई खडसे सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्र चव्हाण श्री अमर मराठे श्री राहुल आवाड श्री हरेश आव्हाड श्री राज ढोले  श्री संस्थेचे प्रशासकीय‌अधिकारी मा. श्री   गणेश चव्हाण,प्राचार्य डॉ बी. बी. पाटील, कनिष्ठ
विज्ञान महाविद्यालयाचे समन्वयक श्री डी .एम. चौधरी , उपप्राचार्य श्री .ए. जी. पाटील,  पर्यवेक्षक श्री. सी. एस. पाटीलश्री .बी .एच पाटील
     कार्यक्रमाचे सुरुवातीला          प्रास्ताविक करताना 
 प्राचार्य डॉ. बी .बी . पाटील यांनी विद्यालयाच्या  प्रगतीचा आढावा सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमात  विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन अतिशय सुंदर प्रकारे नृत्य सादर केली. त्यात  गणेश वंदना ,रामायण,होळी,गडकिल्ल्यांचे रक्षण , गुढीपाडवा, देशभक्तीपर गीत नृत्य सादर केलीत,या कार्यक्रमातून मुलांनी  आपल्यातील कलागुणांचे सादरीकरण करून मान्यवरांची व प्रेक्षकांची मने जिंकलीत. 
     त्याच बरोबर विद्यालयातील गुणी व  आदर्श विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,विद्यालयात वर्षभरात कला, क्रीडा , सांस्कृतिक विभाग,  विज्ञान व गणित विभाग व बाह्य परीक्षा विभाग अंतर्गत घेण्यात आलेले  विविध उपक्रम राबविण्यात येतात त्यात यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांना प्रमाणपत्र  मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. 
 सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक,
 पालक ,राजकिय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार श्री दिलीप आप्पा शेळके श्री नरेंद्र ठाकूर श्री जितेंद्र गिरासे श्री मनोहर देवरे श्री अनिल जाधव श्री रवींद्र टाटिया श्री मंगेशकुमार हिरे आदी उपस्थित होते   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. विविध समितीच्या सर्व घटकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन.पी. बागल, श्री एस बी पाटील, श्री, रमाकांत चव्हाण ,श्री आर. एन. सोनवणे,  श्री.पी.आर.देवरे,श्री.एन.एन.पाटील.श्री एस.डी पाटील, सौ ज्योती  देसले यांनी केले, आभार प्रदर्शन उपप्राचार्य श्री ए जी पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments