दोंडाईचा शहरात गरीब लोकांच्या मदतीला धावून येणारी सेवाभावी संस्था म्हणजे गरीब नवाज वेलफेअर संस्था आहे. या संस्थेची स्थापना गेल्या अठरा वर्षापुर्वी गरीब नवाज ट्रॅव्हलचे मालक माजी उपनगराध्यक्ष नबू बशीर पिंजारी यांनी त्यांच्या काही साथीदारांच्या मदतीने केली होती गरीब नवाज वेलफेअर सेवाभावी संस्था काढण्याचा उद्देश गरीबांना मदत करणे होय या संस्थेचे नाव खाजा गरीब नवाज दर्ग्याचे असल्यामुळे स्वताच्या कमाई मधून थोडा फार दान धर्म करावे असा विचार असतांना दान धर्माच्या फक्त गप्पा करुन मदत करता येत नाही दान धर्म करण्याचे भाग्य ठराविक व्यक्तीच्या नशीबात असते मग धर्म कोणताही असो. गरीब नवाज वेलफेअर संस्थेला कुठलेही शासकीय अनुदान किंवा देणगी मिळत नाही. तरीही गेल्या अठरा वर्षापासून फक्त एक रुपयात मुस्लिम धर्मीयांचा सामुहिक विवाह लावण्याचे काम दरवर्षी सुरु आहे. दरवर्षी सर्व धर्म समभाव चा नारा दिला जातो किंवा सर्व धर्माच्या लोकांना सामुहिक विवाह मध्ये लग्न लावण्याचे आव्हान करतात परंतु फक्त मुस्लिम समाजाचे वधूवर नाव नोंदणी करतात त्यामुळे फक्त मुस्लिम समाजाचा लग्न समारंभ करावा लागतो हा उपक्रम गेल्या अठरा वर्षापासून सुरु आहे. दुसरा उपक्रम म्हणजे गोरगरीब लोकांना (बॅंल्केट) गरम चादरी वाटप केल्या आहेत गरम चादरी वाटपाचा कार्यक्रम गोपालपूरा परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, फुटपाथवर झोपलेले भिकारी व गरीब वस्तीत राहणारे लोकांना चादरी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. असे अनेक उपक्रम असले तरी म्हत्वाचे दोन उपक्रम कौतुकास्पद आहेत. गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे कार्य गोरगरीब लोकांना मदत करणे आहे एक रुपयात सामुहिक विवाह लावण्याचे काम असो का? चादरी वाटपाचे काम असो खरोखरच कौतुकास्पद आहे. महत्त्वाचे म्हणजे सामुहिक विवाह लावण्याचे भाग्य नबू बशीर पिंजारी यांना मिळाले आहे..
0 Comments