Header Ads Widget

*शिंदखेडा वकील संघातर्फे राहुरी जिल्ह्यातील वकील दांपत्याच्या खुन प्रकरणी निषेध मोर्चा व निवेदन*

    
      शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --
शिंदखेडा वकील संघ यांच्या मार्फत राहुरी जिल्हा अहमदनगर कोर्टात वकीली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी सौ. ॲड. मनिषा आढाव यांची  २५/०१/२०२४ रोजी त्यांच्या पक्षकारांकडुन निघुण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी वकीलसंघ शिंदखेडाचे सर्व वकील सदस्यांनी दिवाणी न्यायालय शिंदखेडा येथुन निषेध मोर्चा काढुन तहसिलदार शिंदखेडा यांना सदर घटनेतील दोषींवर कडक शासन व्हावे तसेच सदरचा खटला अतिजलद कोर्टात चालवुन दोषीना दंडीत करण्यात यावे तसेच वकीली करणा-या वकील बांधवांवर होणारे अश्याप्रकारचे हल्ले यांच्या पासुन वकीलांचे संरक्षण व्हावे म्हणुन लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट मंजुर करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांनाही निवेदन देण्यात आले. 
 प्रसंगी शिंदखेडा तहसिलदार श्री ज्ञानेश्वर सपकाळे  व पोलीस निरीक्षक शिंदखेडा पोलीस स्टेशन श्री दिपक पाटील यांनी सदर निवेदन स्विकारुन सर्व शिंदखेडा वकीलसंघाचे सदस्यांना सदर निवेदनातील भावना वरीष्ठ स्तरावर कळविण्याचे आश्वासीत केले.
तसेच सदर घटनेचा निषेध म्हणुन वकील संघ शिंदखेडा यांनी आज रोजी दैनदिन न्यायालयीन कामकाजा पासुन अलीप्त राहण्याचा ठरावा एकमताने संमत करुन न्यायालयीन कामकाजा पासुन अलीप्त राहिले.हयावेळी
 अॅड. व्ही.ए. पवार, अध्यक्ष ,
 अॅड.बी. झेड मराठे, उपाध्यक्ष,अॅड. वसंत.एल.पाटील सचिव,
अॅड.एन.वी. मराठे
अॅड.व्ही.पी. भामरे
अॅड. वी.व्ही. सोनवणे
अॅड.एन.एन.जाधव
अॅड.के.व्ही. भामरे
 अॅड.ए.एन.शेख अॅड.ए.सी. मंगासे अॅड.जे.डी. बोरसे
 अॅड. हर्षल. वी. अहिरराव,अॅड.पी.एस. परदेशी, अॅड. एम. डी. सोनवणे, अॅड.एस.पी.मराठे, अॅड. निलेश. व्ही.पवार
 अॅड.सी.एस. कोळपकर
 अॅड.आर.डी. महिरे
 अॅड. भूषण. बी. मराठे, अॅड. विशाल.बी. मराठे, अॅड. वाय.आर.परमार, अॅड.पी.सी.जाधव, अॅड. बापू.वी. आखाडे
, अॅड. पुजा.आर. कासार, अॅड. शारदा. एम. मराठे, अॅड. अनिता. एन. पाटील
,अॅड. शिरीषकुमार, बी. सोनवणे
, अॅड.शहबाज.ए. शेख आदी वकील संघाचे पदाधिकारी व वकील सहभागी झाले होते.                          

Post a Comment

0 Comments