दोंडाईचा प्रतिनिधी*- शहरातील इच्छामणी गणपती मंदिर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री हरेश आव्हाड यांच्या संकल्पनेतून दिनांक 29 जानेवारी रविवार रोजी त्यांच्या निवासस्थानी हळदी कुंकू चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आझाद चौक, होळी चौक,धनगर गल्ली, रावलनगर, गणपती मंदिर, शिवाजीनगर ईत्यादी परिसरातील पाचशेहुन अधिक सर्व समाजातील महिलांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री हरेश आव्हाड यांनी केले. या कार्यक्रमास मान्यवर म्हणून सौ अनीताताई रविंद्र देशमुख,डॉ. अवनी अनिकेत मंडाले उपस्थित होते. हळदी कुंकूच्या या कार्यक्रमाप्रसंगी संगीत खुर्ची तसेच विविध प्रकारचे खेळ खेळण्यात आले. खेळमध्ये प्रत्येक विजेत्याला बक्षीस म्हणून भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना अमर मराठे,नेहा हर्षल नागरे,प्रतिभा चौधरी,कल्पना भोई, निशा आव्हाड,उषा निकम,सोनल पाटिल,वैशाली आव्हाड,ललिता फटकाळ,छोटी पाटिल,दिपाली चौधरी, सोनी भोई,लता भोई,सुनीता पाटिल,जीजाबाई बागुल,भुमि मराठे,माधुरी मोरे,शोभा गीते आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शंभो ग्रुपचे प्रमुख हरेश आव्हाड यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments