Header Ads Widget

*जरांगें पाटलांच्या आंदोलना मागचे ते सात अदृश्य हात?*



मागच्या पाच महिन्यांपासून सुरू असलेलं मनोंज जरांगें पाटलांचे आंदोलन मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आले. मनोज जरांगेंच्या मागच्या पाच महिन्यांपासून 
सुरू असलेल्या आदोंलनाची वेगवेगळी रुपे पहावयास मिळालीत ,कधी उपोषण, कधी दौरे, कधी जाहीर सभा, आणि शेवटी मुंबई ला निघालेला विराट मोर्चा,  जरांगें पाटलांनी सुरू केलेंलं अंतरवाली सराटी येथे एका हाकेने १५०एकरा वर दिड कोटी लोंकांनी केलेली सभेला गर्दी असेल, किंवा मुंबई ला निघालेला विराट मोर्चा असेल, या सगळ्या व्यवस्थेचे नियोजना मागे कोण आहे? याची  चर्चा व्हायची, जरांगें पाटलांच्या मागे कुठली अदृष्य शक्ती  आहे ? हे जाणून घेण्याचे कुतूहल सगळ्या महाराष्ट्राला होते, मनोज जरांगेंच्या पाठी मागे अदृष्य शक्तीचे पहिले नाव येतं, पांडुरंग तारख, हे अंतरवाली सराटी गावाचे सरपंच,पा़डुरंग तारख यांचा इलेक्ट्रीक ठेकेदारीचा चा मुळ व्यवसायआहे.डिंसेंबर 
२०२२ मध्ये अंतरवाली सराटी चे ग्रामपंचायत निवडणूक लागली तेव्हा पांडुरंग तारख हे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिले. निवडणुकीत तारख यांच्या विरोधात चार पनेल असूनही पांडुरंग तारख यांचा २००मतांनी विजय झाला. मग त्यांनी गावातील सोसायटी जिंकली. गावातील रस्त्यांची कामे केलीत.रस्त्यावर लाईट लावलेत. याच दरम्यान पांडुरंग तारख हे मनोज जरांगेंच्या संपर्कातत आलेत त्याच सुमारास मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं. गावाचे सरपंच म्हणून पांडुरंग तारख यांनी जरांगेंनी केलेल्या आदोंलना साठी स्वताच्या खिशातून मदत केली. आदोंलनासाठी वर्गणी गोळा करण्याचे व खर्चाच्या नियोजनाची जबाबदारी, या शिवाय सरकारचे शिष्टमंडळ, मंत्री, आदोंलनाच्या संदर्भातील कागदपत्रे सांभाळण्याची जबाबदारी पांडुरंग तारख यांनी सांभाळली, जरांगेंच्या प्रत्येक सभेत ते जरांगेंच्या सोबत होते.अदृश्य शक्तीचे दुसरे नाव आहे श्रीराम कुरणकर, एक मित्र दुसरा मित्रा साठी काय करु शकतो,त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम कुराणकर,मनोज जरांगे पाटलांशी २००६ पासून कुरणकरांशी दोस्ती,कुरणकर अ. भा.छावा संघटनेचे कार्यकर्ते, जरांगें पाटलांच्या २०११साली स्थापन केलेली शिवबा संघटना स्थापनेत श्रीराम कुरणकरांनी जरांगें पाटलांना साथ दिली. जालन्यातील कुरण हे कुरणकरांचे गांव, श्रीराम कुरणकर व्यवसायाने शेतकरी, पण जरांगेंच्या आदोंलनात खांद्याला खांदा लावून कुरणकर उभे राहिले, श्रीराम कुरणकर जरांगेंच्या पाटलांच्या सतत सोबत राहून,योग्य वेळी योग्य माणसांशी बोलणं करुन देणं, दौऱ्याच्या वेळी कोणत्या गाडीत बसणार कसा प्रवास करणार,या सगळ्यांवर त्यांचे बारीक लक्ष असायचं ,तिसरे नाव येतं प्रदिप सोंळुंके, प्रदिप सोंळुंके हे चांगले भाषणं, प्रवचनकार म्हणून त्या भागांत ओळखले जातात. सोंळुंके हे शिक्षकी पेशाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते, मराठा सेवा संघ आणि सभांजी ब्रिगेडच्या माध्यमातून ते समाज कारणात सक्रिय होते. जानेवारी २०२३ च्या शिक्षक मतदारसंघातून पांडुरंग तारख यांनी निवडणूक लढविली म्हणून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,मनोज जरांगें पाटलांच्या महाराष्ट्रातील सर्व दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदिप सोंळुंके यांनी साभांळली. चौथे नाव येतं स्वप्निल तारख यांनी जरांगें पाटलांचे आंदोलनाच्या सोशल मीडियाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली, त्याच सोबत डॉ रमेश तारख,संजय कटारे,धनंजय दुफाके,हे सात लोकांनी मनोज जरांगेंच्या आदोंलनाच्या संपुर्ण नियोजनाची जबाबदारी मोठ्या कुशलतेने सांभाळली,हे सात लोकं मनोज जरांगें पाटलांचे कोअर कमिटीचे प्रमुख होते, या सात ही जणांनी मनोज जरांगें पाटलांच्या मैत्री खातर समाजासाठी एकत्र आले, कोअर कमिटीच्या प्रमुखांच्या मागे कोणतीही राजकीय शक्ती नसतांना मनोज जरांगें पाटलांच्या आंदोलनाचे यशस्वी असे नियोजन करून दाखविले.मनोज जरांगें पाटलांच्या अंतरवाली सराटी च्या उपोषणापासून ते मुंबईला निघालेल्या विराट मोर्चा चे संपुर्ण नियोजन, ह्याच सात जणांनी जरा़गेच्या सभेचे, सरकारच्या शिष्टमंडळाचे, जरांगें पाटलांच्या दौऱ्याचे,सोशल मीडिया चे सर्व काही व्यवस्थित व्यवस्थापन ह्याच सात लोंकांनी केले या सात लोंकांच्या पाठीशी मंत्री खासदार आमदार  असे कोणतीही राजकीय शक्ती नसतांना जरांगें पाटलांचे एवढं मोठं आंदोलन ह्या सात जणांनी आपल्या सुत्रबंद्ध अशा नियोजनाने यशस्वी करून दाखवले! मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या प्रसिद्धी आणि चर्चेत हे सात शिलेदार लोंकांच्या आणि सोशल माध्यमाच्या नजरेच्या टप्प्यात कधीच समोर आले नाहीत. मनोंज जरांगें पाटलांचे आंदोलन प्रसिध्दीच्या झोतात असतांनाच हे सात अदृश्य हात लांबच राहिलेत,!
   🌸 अरुण पाटील 🌸
         

Post a Comment

0 Comments