दोंडाईचा शहरात २०१६ पासून अपर तहसील कार्यालय सुरु आहे. जवळपास आठ वर्षे झाले तरी कायमस्वरूपी अपर तहसीलदार मिळत नाही एकाही अधिकारीने तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. गेल्या दोन वर्षांपूर्वी अपर तहसीलदार सुदाम महाजन सेवानिवृत्त झाले तेव्हा पासून प्रभारी तहसीलदार कामकाज पाहत होते. या दोन वर्षामध्ये प्रभारी तहसीलदार म्हणून ज्ञानेश्वर सपकाळे, आशा गांगुर्डे यांनी कामकाज पाहिले आठ- दहा महिन्यापुर्वी राजेंद्र मोरे तहसीलदार मिळाले परंतु तेही एक- दोन महिने रजेवर असतात या दोन वर्षात दोन-चार महिने झाले की बदली किंवा रजा असा प्रकार सुरु असतो. अपर तहसीलदार राजेंद्र मोरे कामकाज पहात असतांना दिड महिन्यापुर्वी त्यांचा किरकोळ अपघात झाला होता त्यानंतर एक महिना विश्रांती घेतली अर्थात रजा घेतली तेव्हा पासून नायब तहसीलदार घोलप यांच्याकडे प्रभारी तहसीलदार पदाचा पदभार दिला आहे. रजा कालावधी पूर्ण होऊ दहा दिवस वरती झाले तरीही अपर तहसीलदार हजर होत नाही अपर व नायब तहसीलदार एकाच अधिकारी कडे पदभार असल्याने लोकांची कामे वेळेवर होत नाही. नायब तहसीलदार घोलप याच्याकडे अपर तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे कर्मचारींवर वचक नाही कर्मचारी कार्यालयात केव्हाही येतात आणि जातात. अपर तहसील कार्यालय म्हणजे "आव जाव घर तुम्हारा" अशी अवस्था झाली आहे. अपर तहसील कार्यालयात काही कामचुकार कर्मचारी आहेत त्यांना प्रभारी अधिकाऱ्यांची भिती नाही कारण अधिकारीच प्रभारी आहे तर आपले काय होणार? म्हणून बिनधास्त बाहेर फिरतात कारण अपर तहसील कार्यालयात हजेरी थम नाही त्यामुळे कर्मचारी केव्हाही येऊन हजेरी रजिस्टर वर सह्या करतो तास दोन तास थांबून पुन्हा फिरायला निघून जातो कारण अधिकारी प्रभारी आहेत तेही धुळ्याहुन येतात त्यामुळे अधिकाऱ्यांची भिती नाही. अशी अवस्था दोंडाईचा अपर तहसील कार्यालयाची आहे. असे किती महिने, वर्षे चालणार? कधीतरी पुर्ण वेळ अपर तहसील मिळणार का नाही? कार्यालयाला सिस्त लागले का नाही? याची जिल्हाधिकारींनी दखल घेऊन पुर्ण वेळ तीन वर्षे टिकतील असे अपर तहसीलदाराची नेमणूक करावी कामचुकार कर्मचारींना वठणीवर आणून कार्यालयात हजेरी थम बसवावा कामचुकार कर्मचारींवर कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.....
✍️✍️✍️ अहिल्या न्यूज मिडिया*साभार
0 Comments