Header Ads Widget

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची उत्तर महाराष्ट्र विभागीय पदाधिकारी बैठक २७ जानेवारी २०२४ रोजी गोंदूर येथील साई लक्ष्मी लॉन्समध्ये संपन्न होणार आहे.




 कॉंग्रेस पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराजजी चव्हाण, अशोकरावजी चव्हाण, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बाबासाहेब कुणाल जी पाटील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष तथा नाशिक विभागाच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे धुळे जिल्ह्याचे प्रभारी डॉक्टर शोभाताई बच्छाव या मान्यवरांसह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि अहमदनगर, नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. संबंधित बैठकीमध्ये चेन्नीथला यांच्याकडून शहर, जिल्हा, ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. बूथ कमिट्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी अशा विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. सदर बैठकीच्या पूर्वतयारी साठी आज माझ्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजाराम पानगव्हाणे हे या विभागीय बैठकीचे समन्वयक म्हणून, जिल्हाध्यक्ष शामभाऊ सनेर, शहराध्यक्ष डॉ अनिल भामरे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती बाजीराव  पाटील आणि त्यांचे सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू आबा पाटील आणि त्यांचे संचालक, पंढरीनाथ पाटील, विजय देवरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments