कालची दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी *मा. महिला व बाल विकास मंत्री मा. अदितीताई तटकरे मॅडम* यांच्यासोबत प्रमुख प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि आज दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची *मा. डॉ. अनुप कुमार यादव, सचिव - महिला व बाल विकास विभाग* तसेच मा. आयुक्त. श्रीमती. रुबल अग्रवाल, उपसचिव वी. रा. ठाकूर, उपयुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेन्शन आणि संप काळातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली..
दोन्ही बैठकीत...
💠 राज्यातील २० हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी सुरुवात झालेली असून सुमारे १७,००० पदांची भरती आतापर्यंत केल्याचे सांगण्यात आले.
💠 इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेल्या अंगणवाडी मदतनीस यांच्या अंगणवाडी सेविका पदावरील थेट नियुक्ती बाबत लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल व त्याद्वारे सुमारे 2500 अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी सेविका पदी थेट नियुक्ती करिता पात्र होतील, अशी माहिती देण्यात आली.
💠 १३,०११ मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रामध्ये करण्याचे काम सुरू झालेले आहे, त्याच सोबत १३,०११ नवीन मदतनीस पदे निर्माण करण्यास देखील शासनामार्फत मान्यता देण्यात आलेली आहे. असे सांगण्यात आले.
💠 अंगणवाडी केंद्रांच्या इमारत भाड्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून त्यामधील अटी व शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहेत. असे सांगण्यात आले.
💠 मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली असून उद्या 26 जानेवारी 2024 पासून मोबाईल फोन सर्व कर्मचाऱ्यांना टप्प्या टप्या ने दिले जातील असे सांगण्यात आले.
💠 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी या अनुषंगाने अंगणवाडी कर्मचारी आणि शासन दोघांचे योगदान एकत्रित करून पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रस्तावास संघटना पदाधिकारी यांनी मान्यता दिली. आणि नवीन सुधारित प्रस्ताव पारित करत पेन्शन लवकरात लवकर लागू करण्यात यावी या बाबत मागणी करण्यात आली. ( संघटना आपले अभिप्राय देतील )
💠 ग्रॅज्युटी बाबत राज्य शासन केंद्र शासनाकडे शिफारस करणार असल्याचे सांगण्यात आले.
तूर्त पेन्शन, ग्रॅज्युटी बाबत प्रस्ताव, मोबाईल चे तातडीने वाटप, 13011 मिनी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण व त्याच 13011 केंद्रांवर मदतनीस भारती, 10 वी पास मदतनीस यांची थेट सेविका पदी नेमणूक, या प्रश्नांच्या लेखी पूर्ततेसह आज रोजी आपला संप आपण तूर्त स्थगित करीत आहोत.
मागील दिनांक ५ डिसेंबर २०२३ रोजीच्या आश्वासना प्रमाणे आशा स्वयंसेवकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव पाहून येत्या नवीन आर्थिक वर्षात पुन्हा मानधन वाढ मिळणार या अश्र्वासानासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, ग्रॅज्युटीची पूर्तता आणि इतर प्रमुख प्रश्नांसाठी नव्याने लढा उभारून आपल्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणार आहोत.... असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती मार्फत करण्यात येत आहे
*हमारी युनियन* 💪🏻✌🏻
*हमारी ताकत* 💪🏻✌🏻
श्रीमती. माया परमेश्वर, श्री. अरुण गाडे, श्री. संजय मापले. श्रीमती. चंदा नवले, श्री. यशवंत माटे, श्रीमती. शुभांगी पालशेतकर, श्री. युवराज बैसाने, श्री. रामकृष्ण पाटील, श्री. दत्ता जगताप, श्री. सुधीर परमेश्वर, श्री. अमोल बैसाने
🔰🔰🔰💐💐🔰🔰🔰
0 Comments