Header Ads Widget

शिंदखेडा उज्वल शैक्षणिक संकुल येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरी




(शिंदखेडा)उज्वल शैक्षणिक संकुल येथे प्रजासत्ताक दिनाचा ७४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरी करण्यात आला. उद्योजक श्री मनोहर भोजवाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डॉ.आर.आर.पाटील होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी


 देशभक्तीपर गीत गायन व समूह नृत्य सादर केलेत.कवायत सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.चि.तन्वीर पिंजारी याने वक्तृत्व केले त्यास प्रमुख पाहुण्या कडून ५०० रू.बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य दयाराम माळी, सेवानिवृत्त शिक्षक श्री आर. बी. पाटील, श्री हिरालाल धनगर जाधव,श्री गोकुळ पाटील, श्री देवीदास बागुल, श्री भगवान पवार, श्री भिमसिंग गिरासे, पालक तसेच संस्थेचे सचिव इंजि.उज्वल आर.पाटील, संचालक श्री अनिल पाटील संचालिका सौ अनिता रमेश पाटील, प्राचार्य एम.डी. पाटील, मुख्याध्यापक श्री एस.आर. पाटील, प्र. मुख्याध्यापिका ए.के. माळी विद्यार्थी,शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments