Header Ads Widget

शिंदखेडा येथे विरदेल शिवारात मेंढी मारुन केला पुन्हा मालकांना ही जखमी - पोलीस स्टेशन ला तक्रार करून ही दखल नाही*





*  शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी - काल झालेल्या अत्यंत मेंढपाळ हयांना वाईट अनुभव आला. जे शेतकरी साठी जमिनीवर आपल्या मेंढी चारत जमिन थोड्या प्रमाणे दिवस रात्री ची जिवाची पर्वा न करता मेहनत करता आपला संघर्ष करण्याची ताकद घेऊन जिवाची बाजी लावणारे


 मेंढपाळ कष्टमय संघर्ष करतात . असीच घटना काल शिंदखेडा विरदेल शिवारात झाली. घटना अशी घडली,शिंदखेडा शहरानजीक विरदेल शेत शिवारात मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या वर काल दूर्दीवी प्रसंग आला तो म्हणजे रस्ता क्रास करताना चार मेंढी मारली,  तर तडजोडी अंती भरपाई देवु असे मान्य करत काही काळ लोटला तोच सुलवाडे गावातील  काही नागरिकांनी छोटा हत्ती ,मोटारसायकल, ट्रकर ने त्यांच्या गस्तीवर हल्ला चढवला तेथेही त्यांनी तिन चार मेंढी कोयटा व इतर हत्यार ने मारुन मेंढपाळ चार दोन महिला सह जबर मारहाण केली.शिवाय पत्तीस चाळीस मेंढी घेऊन गेले चा आरोप केला आहे. शिंदखेडा पोलीस स्टेशन ला हया विषयावर मेंढपाळ यांनी तक्रार दिली आहे पण गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करत आहे वरीष्ठ अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी मेंढपाळ करत आहे .ह्यामध्ये प्रवीण चैत्राम वाघमारे, शिवा सुभाष वटगर, सरलाबाई वटगर , विमलबाई वाघमारे यास जबर जखमी केले असुन त्यांना धुळे येथे शासकीय रुग्णालय येथे दाखल केले आहे. त्यांचे जबाब येत नाही तोपर्यंत आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाहीत असे शिंदखेडा पोलीस स्टेशन चे म्हणने आहे. हयासाठी नाना पडळकर, राहुर वाघमारे, भिवा वाघमारे, सुभाष सटक, सुरेश सटक, नारायण पडळकर, पिंटू सोनु, विनोद धनगर, रविंद्र गोरख, पांडुरंग कोळी यांनी आरोप केला आहे आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार केली आहे. सदर प्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मेंढपाळ यांनी मागणी केली आहे. आमच्या वर दिवसा रात्री असे प्रकार होत असतील तर आम्ही जिवन कसे जगायचे. आमच्या अर्धांगिनी ना सुरक्षा लसेल तर आम्ही काय करू पोलीस प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ हजर राहणे अनिवार्य होते ते केले जात नाही. मोठा अनर्थ घडत असताना ही बाब वरीष्ठ अधिकारी यांनी घ्यावी अन्यथा मोठा उद्रेक होणार अशी मेंढपाळ यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments