Header Ads Widget

*प्रकाशा- बुराई योजनेला 'सुप्रमा' चा मार्ग मोकळा..* *ईपीसी ची परवानगी मिळाली: आ. जयकुमारभाऊ रावल यांच्या प्रयत्नांना मोठे यश*




दोंडाईचा: शिंदखेडा, नंदुरबार व साक्री तालुक्यातील अनेक गावांसाठी जीवनदायी असलेली प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कामाला ब्रेक लागला अन काम बंद झाले. त्यानंतर या योजनेचे काम पूर्ववत सुरू होण्यासाठी 'सुप्रमा' अर्थात सुधारित प्रशासकीय योजनेची आवश्यकता होती ती सुप्रमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुप्रमा च्या आधी ईपीसी अर्थात व्यय अग्रक्रम समितीची बैठक संपन्न झाली त्यात या योजनेला ही मंजुरी देण्यात आली, पुढील २-३ दिवसात सुप्रमा मिळणार आहे त्यामुळे माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. 
          १९९९ पासून मंजूर असलेली शिंदखेडा, नंदुरबार, साक्री या तीन तालुक्यातील अनेक गावांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेली प्रकाशा (तापी) - बुराई उपसा जलसिंचन योजनेचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे, त्यांचे पहिल्या टप्प्यातील पाईपलाईनचे काम ही पूर्ण झाले आहे, परंतु मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या योजनेचे काम बंद झाले त्यानंतर या योजनेचे काम सुरू होण्यासाठी 'सुप्रमा' ची आवश्यकता निर्माण झाली, परंतु महाविकास आघाडीच्या काळात ती सुप्रमा मिळाली नाही त्यानंतर राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आल्यानंतर माजी मंत्री आ. जयकुमारभाऊ रावल यांनी अनेकवेळा पाठपुरावा केला, विधानसभेत ही याबाबत आग्रही मागणी केली त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला लवकरच सुप्रमा देन्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सुप्रमा साठी इपी सी ची परवानगी आवश्यक होती ती परवानगी वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परवानगी देण्यात आली. त्यामुळे आता पुढील २-३ दिवसांत सुप्रमा मिळेल आणि या योजनेचे काम सुरू होईल. 


*महायुती सरकारचे मनपूर्वक आभार :आ. जयकुमारभाऊ रावल* 

शिंदखेडा तालुक्यासह नंदुरबार व साक्री तालुक्यातील अनेक गावांसाठी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या या योजनेसाठी सुप्रमा ची आवश्यकता होती. मागील महाविकास सरकारने ती सुप्रमा मुद्दाम दिली नाही परंतु राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी विधानसभेत आम्हाला आश्वासन दिले होते व तो शब्द आता खरा होतोय, त्यानुसार ईपीसी च्या बैठकीत या योजनेला परवानगी अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी दिली. त्यामुळे पुढील २-३ दिवसांत योजनेला सुप्रमा देखील मिळेल.व  आमच्या भागातील ही योजना लवकरच प्रत्यक्षात साकारेल. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथराव  शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी  फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे मनपूर्वक आभार.. 
: आ. जयकुमारभाऊ रावल

Post a Comment

0 Comments