Header Ads Widget

शाहीर हरिभाऊ मराठा पाटील समाज मंगल कार्यालयाला केलेली मदत समाजाप्रती असलेल्या कर्तव्य भावनेने केली - ना .डॉ . विजयकुमार गावित






नंदूरबार - मी नोकरी सोडून नंदूरबारकर जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो , नंदूरबारकरांनी माझ्यावर डोळे बंद करून प्रेम केले , भविष्यातही एकमेकांच्या मदतीने उभारणीचे काम करण्याचा आपला निर्धार असून येत्या दोन तीन वर्षात शेतात पाणी घालण्याचा आपला संकल्प आहे .नद्या


 नाल्यांना शंभर टक्के बंधारे बांधून पाणी अडवू , पाणी जिरवू .नंदूरबारसाठी पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेऊन तापी बुराई योजनेस लवकरच मान्यता मिळेल अशी मी खात्री देतो आणि स्वातंत्र्यसैनिक शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयास जी दोन कोटी निधी देऊन मदत केली ती माझ्यावर निव्याज प्रेम करणाऱ्या समाजाप्रती कर्तव्य भावनेने केली ' असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आदिवासी विकास खात्याचे मंत्री ना डॉ . विजयकुमार गावित यांनी धुळे रोड तय्यबी नगर ज्ञानदीप सोसायटी येथील शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालयाच्या इमारत विस्तार बांधकाम , भूमिपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी बोलतांना व्यक्त केले . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदूरबार मराठा पाटील समाजाचे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब बी एस पाटील हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून संसद महारत्न खासदार डॉ हिनाताई गावित , जि प अध्यक्षा डॉ . सुप्रियाताई गावित उपस्थित होते . या वेळी सभामंचावर संस्थेचे सचिव यशवंत देवराव पाटील , उपाध्यक्ष विश्वास झुलाल पाटील , उपाध्यक्ष शालीग्राम चतुर पाटील , सहसचिव निंबाजी बागुल , सहसचिव रमेश दिगंबर मोरे, सहसचिव विलास मुरलीधर अहिरराव , सहसचिव राजेंद्र हिम्मतराव बागुल , खजिनदार डॉ .एस आर पाटील जे एन, पाटील सर , संस्थेचे कायदेशिर मदत करणारे कायदेतज्ञ अॅड प्राचार्य पी एन देशपांडे , वास्तु इंजीनियर संजय देसले , डॉ . प्रा एन् डी नांद्रे , युवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते  . कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव यशवंत देवराव पाटील यांनी केले . प्रमुख पाहुण्या जि प अध्यक्षा डॉ . सुप्रिया ताई गावित यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व चांगली वास्तु व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली ., व दोन कोटीच्या निधीसोबत भविष्यातही सर्वोत्परी चांगल्या कामासाठी आम्ही पाठीशी राहु असे आश्वासन दिले .नंदूरबारच्या खासदार प्रमुख पाहुण्या  डॉ . हिनाताई गावित यांनी आपल्या भाषणात केलेल्या विकास कामांची माहिती दिली .विकास कामाचा एक भाग म्हणूनच ना . गावित साहेबांनी मंगल कार्यालयाला निधी दिला असून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी एस दादा पाटील हे माझे गुरू असून मी फिझिक्स विषयात कच्ची असतांना त्यांनी या विषयात विशेष लक्ष दिल्याने मला आत्मविश्वास आला व मी यशस्वी झाले .आज गुरू बी एस दादांनी माझी पाठ थोपटली याचा मला शिष्य म्हणून नक्कीच अभिमान आहे . श्रीमती उषाताई हरिभाऊ पाटील यांनी केलेली तीस लाखाची भरघोस मदत समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे खा . हिनाताई गावित यांनी नमूद केले . या वास्तुचा भेटीगाठी , समाजाच्या विचार विनिमयासाठी , समाजाच्या कल्याणासाठी उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आपल्या राजकिय जिवनात मदत केलेल्या समाजाचे जेष्ठ धुरंधरांप्रती त्यांनी ऋण व्यक्त केले       नंदूरबार मराठा पाटील समाजाचे अध्यक्ष प्राचार्य दादासाहेब बी एस पाटील अध्यक्षीय समारोप करतांना मंगल कार्यालयासाठीचा संघर्षाचा आढावा घेत म्हणाले , ना . विजयकुमार गावित साहेबांनी मंगल कार्यालयास सकारात्मक दृष्टीने दोन कोटीच्या निधीची मदत केली .सदरचे मंगल कार्यालय केवळ लग्नासाठी नसेल तर समाजातील रूढी परंपरा यांचे जतन करून निकोप समाजाच्या निर्मितीसाठी येथे प्रयत्न होतील , विधवा , परित्यक्त्या यांना उभारी देण्याचे कामाबरोबरच स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळावे म्हणून ग्रंथालयाची निर्मिती केली जाईल . सामाजिक , शैक्षणिक  , सांस्कृतिक बाबी व घटनेच्या कामासोबत विविध उपक्रम राबविणाऱ्या जितेंद्र पाटील यांचे कौतुक केले  , ना . विजयकुमार गावित यांनी दिलेला दोन कोटीचा निधी आम्ही मंगल कार्यालयाच्या माध्यमातून समाजाभिमूख कामासाठी कारणी लावू अशी खात्री देत ना गावित साहेबांचे ऋण व्यक्त करीत असतांनाच उषाताई हरिभाऊ पाटील यांनी तीस लाखाची केलेली भरघोस मदत आम्हाला प्रेरणादायी ठरली . संस्थेच्या कामी कायदेशीर सल्लागार  अॅड . प्राचार्य पी एन देशपांडे , जे एन पाटील , वास्तुतज्ञ संजय देसले, यांचे आपल्या भाषणातून बी एस दादा यांनी विशेष आभार मानले . या प्रसंगी  मंगल कार्यालयास भरघोस मदत देणाऱ्या उषाताई हरिभाऊ पाटील यांचा जि प अध्यक्षा सुप्रिया ताई गावित यांनी विशेष सत्कार केला .स्वातंत्र्यसैनिक शाहिर हरीभाऊ पाटील , मराठा समाजाचे दिवंगत नेते स्व .जी टी बापूजी पाटील यांच्या तैलचित्रांना मान्यवरांनी हार घालून अभिवादन केले .. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नरेंद्र पाटील यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री रविंद्र पाटील , मधुकर पाटील , लहु पाटील, प्रकाश पाटील , रोहिदास पाटील , अजय पाटील , कल्याण पाटील आदिंनी परिश्रम घेतले . प्रा डॉ .एन डी नांद्रे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले . महाराष्ट्रगीत व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली . कार्यक्रमास जिल्हाभरातील मराठा पाटील समाज बांधव व मंगल कार्यालय परिसरातील सर्व जाती जमातीतील बांधव उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments