Header Ads Widget

*डॉ. अनिकेत पाटील यांचा लग्नाचा वाढदिवस व मुलीचा वाढदिवस मतिमंद विद्यालयात साजरा*




दोंडाईचा-- आज दिनांक 04/02/2024 वार रविवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर संचलित स्व . खंडू पाटील निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे दोंडाईचा शहराचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. श्री अनिकेत पाटील यांची कन्या कु .आनंदिता पाटील हिचा प्रथम वाढदिवस आणि डॉ.अनिकेत पाटील व डॉ.अवनी पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस शाळेतील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर केक कापून साजरा करण्यात आला .*
शाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी डॉ.अनिकेत अशोक पाटील ,डॉ.सौ.अवनी अनिकेत पाटील ,डॉ.अशोक मंडाले,सौ अनिता मंडाले, सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय आशिष अशोक पाटील, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विनायक रामदास सूर्यवंशी,हर्षद शिंदे,धनराज कोळी,रामकृष्ण पाटील यांची उपस्थिती लाभली .सर्वप्रथम शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनीकडून कु.आनंदीताचे आणि डॉ.अनिकेत पाटील व डॉ.अवनी पाटील यांचे औक्षण करण्यात आले .नंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या वेळेस डॉ.अशोक मंडाले यांनी विद्यार्थ्यांची स्वच्छता शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त आणि शाळेत कार्य करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले .तसेच डॉ.अनिकेत पाटील  यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले .विद्यार्थ्यांबद्दल बोलताना डॉक्टर अनिकेत पाटील हे खूपच भावुक झाले होते,त्यांनी त्यांच्या पत्नी बालरोग तज्ञ डॉ.अवनी पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोफत करण्याचे आश्वासन दिले आणि त्यांच्या परिवारातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांनी  मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतला .
शाळेचे संस्था अध्यक्ष मा. शिवाजीराव साळुंके पाटील, मुख्याध्यापिका, सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याकडून कु.आनंदीता हिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माननीय डॉक्टर श्री .अनिकेत पाटील, व डॉ . सौ .अवनी पाटील यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments