धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांतील.. शिंदखेडा,साक्री नंदुरबार तालुक्यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रकल्प प्रकाशा बुराई सिंचन योजनेला 800 कोटीच्या निधी प्रशासकीय स्तरावर मंजुरी मिळाली मग काय नेहमी प्रमाणे राजकारण्यांची श्रेयवादाची लढाई सुरू झाली दि.29 ऑगस्ट रोजी दोंडाईचा येथील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर भामरे यांच्या मा.नामदार अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यावेळी मा. ज्ञानेश्वर भामरे यांनी प्रकाश बुराई सिंचन योजनेला तात्काळ निधी मंजुर करावा अशा पद्धतीचे निवेदन दिले होते. त्यावेळी मा. अजित दादा पवार हे सत्तेत नव्हते पण नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत युती करून महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तळागाळातील सर्व सामान्य कार्यकर्त्याचीं मतदारसंघातील कामं तात्काळ मार्गी लावणे यासाठी अजित दादा पवार प्रचलित आहेत. 100 कोटींचा प्रकल्प 800 कोटींवर आणायचे श्रेय कोणीचं घेत नाही. 24 वर्षांपासून शेतकऱ्यांचा भावनेशी तुम्ही खेळलात याचं श्रेय कोणीचं का घेत नाही तापी बुराई समितीचे कार्यकर्त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात चार दिवस मंडप टाकून आंदोलन केले तेव्हा एका नेत्याला सोडून कोणीही त्यांची दखल घेतली नाही. विधानभवनात चार शब्द बोलून प्रश्न मार्गी लागत नसतात. मोठ्या मनाने स्वीकार करावा लागतो की हे श्रेय नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांचं आहे. मा.अजित दादा पवार सत्तेत सहभागी झाले म्हणून याला निधीचे सहकार्य लाभले यात तिळमात्र शंका नाही आणि याला वेळोवेळी निवेदने व सुचना देणारे मा. ज्ञानेश्वर भामरे हे तितकेच खरे मानकरी आहेत हे त्रिवार सत्य आहे. मतदारसंघात विरोधक तयार होऊचं द्यायचं नाही असा पवित्रा काही आमदारांनी घेतला आहे तुम्ही कोण ठरवणारे ही तालुक्यातील जनता ठरवेन कारण लोकशाहीत जनताचं सर्वस्व असते ही गोष्ट विसरता कामा नये. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments