Header Ads Widget

फसवणुकीची रक्कम दीड कोटीच्या घरात; टोळीतील संशयित बबल्याच्या बँक खात्यात 71 लाखांची रोकड


धुळे--जीएसटी अधिकाऱ्याची बतावणी करून मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक अडवून व्यापारी फसवणूक प्रकरणात लवकरच परराज्यातील टोळीला अटक होण्याची शक्यता आहे. 

या प्रकरणात दोन दिवसांपूर्वीच अटक झालेला संशयित बबल्या याच्या बँक खात्यात ७१ लाखांची रोकड आली आहे.

त्यामुळे फसवणुकीची रक्कम एक कोटी ४६ लाखांवर गेली आहे. ही रक्कम दुप्पट होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील महामार्गावर जीएसटी अधिकारी असल्याचे खोटे सांगत पटियालातील व्यापाऱ्याची फसवणूक झाली होती. या प्रकरणाचा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने छडा लावला.

त्यात निजामपूर (ता. साक्री) येथील पोलिस कर्मचारी बिपीन पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख याच्यासह नाशिक येथून स्वाती पाटील यांना याआधीच अटक झाली आहे.

तिघे पोलिस कोठडीत आहेत. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी विनय सुरेश बागूल ऊर्फ बबल्या यास अटक झाली होती. चौकशीत त्याच्या बँक खात्यात ७१ लाखांची रोकड जमा झाल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत त्याला बँकेने विचारणा केली. तसेच तपासात आणखी चार संशयित समोर आले आहेत. त्यांनी आमच्या नावाने अकाउंट उघडल्याचे सांगितले. या प्रकरणात चोवीस तासांच्या आत परप्रांतीय टोळीलासुद्धा अटक होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच स्वाती पाटील ही बँकेची रिजनल हेड होती. त्यामुळे या प्रकरणात फसवणुकीची रक्कम दोन कोटींवर जाण्याचीही शक्यता पोलिस अधीक्षक धिवरे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments