शिंदखेडा(वा.)-मागील 40 वर्षापासून सामाजिक,कौटुंबिक समस्या,सामूहिक विवाह,महिला सक्षमीकरण,आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन,जलस्रोत विकास,आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदि क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 30 नोव्हेंबर व 1डिसेंबर 2014 रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन बिबेवाडी पुणे येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला खानदेशातून 75 पेक्षा अधिक सदस्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा यांनी दिली.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातील मान्यवर, राजकीय नेते,प्रसिद्ध उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील तज्ञ आणि बीजेसचे 3000 कार्यकर्ते सहभाग होणार आहेत.
या दोन दिवसात उद्घाटन सत्राबरोबर अनेक सत्र थेट संवाद,सांस्कृतिक कार्यक्रम,शपथविधी असा भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. यात देशभरातून आलेले तज्ञ मार्गदर्शन करतील.बदलती जीवनशैली आणि काळानुसार जैन समाजासमोर निर्माण झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर जसे की कौटुंबिक, सामाजिक प्रश्न विचारमंथन होऊन त्यावरील उपायांवर सविस्तर चर्चा होणार आहे.तसेच नव्या पिढीला समजेल अशा त्यांच्या भाषेत बीजेएसने तयार केलेल्या खास कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर नव्या राष्ट्रीय कार्यकारणीचा शपथविधी आणि सहभागी राज्याचे सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होणार आहे.विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली असून संस्थेची जोडलेली गेलेले अनेक राज्यातील हजारो समर्पित कार्यकर्ते यात सहभागी होणार आहे.
बेंगळूर,चेन्नई, उदयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर यावर्षी पुणे शहर या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे.मागील तीन-चार महिन्यापासून या अधिवेशनाची तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यात देशभरातील बीजेएसचे 3000 कार्यकर्ते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहे. मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल याबद्दल शंका नाही असा विश्वास भारतीय संघटनेचे संस्थापक श्री शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.
0 Comments