Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा





सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री सी जी वारूडे 
    शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


         सविस्तर वृत्त असे की माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात "संविधान दिवस"कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला यावेळी कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री.एस.ए.कदम सर होते यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       प्रथमतः विद्यार्थीवर्ग व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी सामुहिक "संविधान प्रतिज्ञा" वाचन घेण्यात आले.
  तद्नंतर विद्यार्थ्यांनी भाषण व्यक्त केली व शिक्षकांनी संविधान बद्दल व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविषयी मनोभाव व्यक्त केले.
      शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस ए कदम यांनी संविधानाविषयीचा मतार्थ समजून दिला की,भूतालावर जन्माला येणारा प्रत्येक जीव नाशवंत आहे,मृत्यू हा त्याचा अंतिम टप्पा आहे.असे म्हटले जाते की जन्मानंतरचा पहिला श्वास,आणि मृत्यूपूर्वीचा शेवटचा श्वास या दोन्ही श्वासातील अंतर म्हणजेच 'आयुष्य' या आयुष्याच्या वाटेवर हवे असलेले,नको असलेलं जीवन जगावंच लागतं.म्हणून "जीवनात काही व्यक्ती स्वतःपुरत जगतात, ते जिवंतपणी मृत असतात;मात्र जे इतरांसाठी जगतात ते मेल्यानंतरही जिवंत असतात"
      अशा विविध दूरदृष्टीकोनातून संविधानातील महत्त्व हे एक जीवन शैलीला प्रेरणादाय घटना होय.त्यावेळी डॉ.बाबासाहेबांच्या मूलमंत्रांविषयीचे ही महत्त्व पटवून दिलेत.
       यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.आर.बी.गवळे यांनी मानले यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,पालकवर्ग, मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments