Header Ads Widget

बेटावद येथे श्री फ. मु. ललवाणी माध्यमिक विद्यालय व डॉक्टर दादासाहेब श्री. तू. गुजर. उच्च माध्यमिक विद्यालयात संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त *घर घर संविधान* कार्यक्रम संपन्न.




बेटावद प्रतिनिधी 

शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील श्री फ. मु. ललवाणी  माध्यमिक विद्यालय व डॉक्टर दादासाहेब श्री. तू. गुजर. उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक 26/11/2024 मंगळवार रोजी संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त *घर घर संविधान* कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री डी जी पवार सर यांनी भूषविले.  यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षक बंधू भगिनींनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केले. त्यानंतर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री व्ही पी कढरे सर यांनी भारतीय संविधानाची तत्वे व महत्व याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी 26/11/2008 यावर्षी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री डी जी पवार सर,  उपप्राचार्य श्री व्ही पी कढरे ,  पर्यवेक्षक श्री पी व्ही माळी व सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर बंधू हजर होते

Post a Comment

0 Comments