Header Ads Widget

धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,अमरीश पटेल, गावितांना संधी? महायुतीच्या मंत्रिमंडळाकडे खान्देशचे लक्ष




मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात भाजपा-शिंदे सेना व अजित पवार गटाला स्पष्ट बहुमत मिळाले असून महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा येत्या दोन दिवसातच होत आहे.
या मंत्रिमंडळात धुळे जिल्ह्या- तून आ. जयकुमार रावल, आ.अमरीशभाई पटेल, यांच्यापैकी एकाला तर साक्रीच्या आ. मंजुळाताई गावित यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येत असून त्यांच्या उपस्थितीतत महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घोषीत होईल. बहुमताच्या आधरारावर भाजपाचे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता असून त्यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मंत्रिमंडळात धुळे जिल्हयातून ज्येष्ठतेच्या आधारावर शिंदखेड्याचे आ. जयकुमार रावल तसेच शिरपूरचे आ. अमरीशभाई पटेल या दोघांपैकी एकाची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.
साक्रीच्या आ. मंजुळाताई गावीत ह्या शिंदे सेनेच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर त्यांचाही शिंदे सेनेच्या कोट्यातून मंत्रिमंडळात राज्यमंत्री होण्याची अधिक शक्यता आहे.
मंजुळाताई गावीत ह्या महिला असून आदिवासी असल्याने एका आदिवासी महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण होईल..

या निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाचही जागा महायुतीने जिंकल्या असून संपूर्ण जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व निर्माण झाल्याने जिल्ह्यातून वरील तिघांपैकी दोघांचा मंत्रिमंडळात निश्चित समावेश होईल अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments